Namibian Male Cheetah Dies: कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियाचा चित्ता पवनचा मृत्यू, प्राथमिक कारण स्पष्ट, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा
त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असावा, अशी प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूबाबत नेमके कारण समजू शकणार आहे.
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) पवन (Pawan) हा नामिबियन चित्ता (Namibian Cheetah Dies) मंगळवारी (27 ऑगस्ट) सकाळी 10:30 च्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (APCCF) आणि सिंह प्रकल्पाचे संचालक उत्तम यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, नर चित्ता नाल्याच्या काठावर झुडपांमध्ये कोणतीही हालचाल न करता निपचीत पडलेला आढळून आला.
पवनच्या डोक्यासह शरीराचा पुढचा अर्धा भाग पाण्यात
नामिबियन चित्ता निपचीत पडल्याची माहिती मिळताच, पशुवैद्यक आणि कुनो नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चित्त्याची पाहणी केली तेव्हा, त्याचे डोक्याकडील बाजूचे अर्धे शरीर पाण्यात बुडालेले पाहायला मिळाले. पवनच्या डोक्यासह शरीराचा पुढचा अर्धा भाग पाण्यात बुडाल्याचे दिसून आले, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, चित्त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असू शकतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर निश्चित निष्कर्ष काढला जाईल. (हेही वाचा, Kuno National Park मध्ये मादी चित्ता Gamini ने दिला 5 बछड्यांना जन्म)
पवन चित्ता भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग
वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय पुनर्संचयनासाठी राष्ट्राच्या समर्पणाचे प्रतीक असलेला, पवन चित्ता हा भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग होता. आफ्रिकन चित्ता गामिनीच्या पाच महिन्यांच्या शावकाच्या मृत्यू 5 ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर पुढच्या काहीच काळात पवनचा मृत्यू झाला आहे. पवनच्या निधनानंतर, कुनो नॅशनल पार्कमध्ये आता 24 चित्ते आहेत, ज्यात 12 प्रौढ आणि 12 शावक आहेत. या घटनेमुळे भारतातील चित्त्यांची स्थिर लोकसंख्या राखण्यात येणाऱ्या आव्हानांबाबत चिंता निर्माण झाली आहे, जो चालू असलेल्या संवर्धन उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. (हेही वाचा, कुनो नॅशनल पार्क मधील नामिबियन चित्ता 'Shaurya'चे निधन)
APCCF कडून अधिकृत स्पष्टीकरण
नामिबियन चित्ता (Acinonyx jubatus): हा मध्यम आकाराच्या मार्जर कुळातील प्राणी आहे. जी संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत आढळते. या प्रजातीमधील सर्वात मोठ्या नराचे वजन वजन 150 पौंडांपर्यंत असते, तर मादी त्याहून थोड्याशा लहान असतात. जी जास्तीत जास्त 130 पौंड असते. संशोधनात असे दिसून आले आहे की, नामिबियन चित्त्यांचा निवास हा, उच्च दृश्यमानता असलेल्या गवताळ भागात असतो. भक्ष्य म्हणून ते इतर प्राण्यांना मारुन खातात. आपल्या वेगासाठी ते विशेषत्त्वाने ओळखले जातात. ते ताशी 70 mph (113 km/तास) पेक्षा जास्त वेगाने पळू शकतात. अंगावरील केसाळ त्वचा आणि त्यावरील विशिष्ट डाग हे त्यांचे खास वैशिष्ट्य असते.