Char Dham Yatra: हायकोर्टाच्या विरोधानंतर सुद्धा उत्तराखंड सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जाहीर, 1 जुलै पासून सुरु होणार यात्रा
हायकोर्टाने सोमवारी सुनावणी करत कॅबिनेटचा निर्णय बदलत चारधाम यात्रेला परवानगी नाकारली आहे.
Char Dham Yatra: उत्तराखंड हायकोर्टाने चारधाम यात्रेवर 5 जुलै पर्यंत बंदी घातली आहे. हायकोर्टाने सोमवारी सुनावणी करत कॅबिनेटचा निर्णय बदलत चारधाम यात्रेला परवानगी नाकारली आहे. हायकोर्टाने तीर्थ क्षेत्रासंबंधित भावना लक्षात घेता सरकारद्वारे मंदिरात सुरु असलेल्या पूजाविधा आणि समारोहांचे देशभरात थेट प्रसारण करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. परंतु हायकोर्टाच्या विरोधानंतर सुद्धा उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसंबंधित गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.
उत्तराखंड सरकारने कोविड19 संबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये असे म्हटले की, 1 जुलै पासून चारधाम यात्रेचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर 11 जुलै रोजी यात्रेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. पण चारधाम यात्रेसाठी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असण्यासह तो सोबत घेऊन येणे अनिवार्य असणार आहे.(Mann ki Baat: कोविड-19 लस घेण्यास संकोच करु नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन)
Tweet:
दरम्यान, हायकोर्टाने यात्रेच्या दरम्यान पर्यटक आणि भाविकांसाठी राज्य सरकारच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. मुख्य न्यायाधीश आरएस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने राज्य मंत्रिमंडळच्या त्या निर्णयावर बंदी घातली ज्यावर रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील स्थानिकांना 1 जुलै पासून हिमालयी धामांच्या दर्शनासाठी परवानगी दिली होती.
हायकोर्टाने म्हटले होते की, सध्याची परिस्थिती आणि लोकांच्या भावना पाहण्याऐवजी कोरोना व्हायरसचा नवा वेरियंट डेल्टा प्लस पासून सर्वांचा बचाव करणे अधिक महत्वाचे आहे. याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत मैनाली यांनी म्हटले, यात्रेसाठी कोणालाही भौतिक रुपात जाण्याची परवानगी नसणार आहे. उत्तरांखंडचे मुख्य सचिव ओमप्रकार आणि पर्यटन सचव दिलीप जावलकर हे सुनाणीसाठी वर्च्युअल रुपात उपस्थितीत होते.