Indians Saving And Investment: बँकांमधील बचत घटतीय, भारतीयांचा पैसा जातोय तरी कोठे? काय आहे गुंतवणूक फंडा?

त्यामुळे बँकांकडील ठेवींच्या प्रमाणावर थेट परिणाम होताना दिसतो आहे. खास करुन भारतीय मालमत्ता, गृह आणि वाहनकर्ज अशा मालमत्ता निर्मितीवर गुंतवणूक करत असल्याचेही एका आकडेवारीवरुन पुढे आले आहे.

Indian Currency | (Photo credit: archived, edited, representative image)

Changing Trends of Saving And Investment: बँकांमध्ये बचत खात्यावर मोठी रक्का जमा करणे हा तसा भारतीयांचा पारंपरीक आणि प्रचलीत पद्धत. पण याच पद्धतीतक काहीसा बदल झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडील अलीकडील डेटावरुन पुढे आले आहे. अलिकडील काही काळामध्ये भारतीयांच्या बचतीच्या सवय आणि पद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे. तसेच, भारतीय समूदाय 'खर्च वाचवा बचत वाढवा' या त्याच्या मुलभूत धोरणापासून दूर झाल्याचेही पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आरबीआय बुलेटिनमध्ये जारी झालेल्या डेटामध्ये भारताच्या निव्वळ घरगुती आर्थिक बचत, बँक बचत, रोख आणि गुंतवणुकीचा समावेश करून, FY23 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 5.1 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे सूचित करण्यात आले आहे. ही आकडेवारी FY20-21 च्या तुलनेत 7.1 टक्क्यांनी घसरल्याचे दर्शवते. (Indians Saving And Investment)

आरबीआयचा डेटा सांगत की, नागरिकांचा बँकांमधील बचतीचा ओढा कमी झाला आहे. इतकेच नव्हे तर ते पारंपरीत पद्धतीपासून दूर निघाले आहेत. त्यामुळे बँकांमध्ये पैसे न गुंतवता इतर पर्यायांचा मार्ग अवलंबणाऱ्या भारतीयांचा पैसा जातोय तरी कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काही कारणे पुढे आली. ती खालील प्रमाणे. (हेही वाचा, अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?)

भौतिक मालमत्ता निर्मितीमध्ये वाढ:

वित्त मंत्रालयाने एका माहितीमध्ये म्हटले आहे की, घरे आणि वाहने यासारख्या भौतिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा कल वाढतो आहे. आरबीआयची आकडेवारी सांगते की, कोरोना महामारीनंतर बँकांच्या कमी व्याजदरामुळे भारतीयांचा कल इतर गुंतवणुकीकडे वळला आहे. बँकांकडील ठेवींवरील व्याजदरामध्ये मोठी घट अनुभवायला अल्याने नागरिक इतर स्त्रोत शोधत आहेत. ज्यामुळे त्यांची भौतिक मालमत्का वाढत आहे. (हेही वाचा, Savings and Investment Tips: बचतीसोबतच गुंतवणूक वाढवा, भविष्य सुखकर करा; जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स)

किरकोळ कर्ज हे घर, शिक्षण आणि वाहन खरेदीसाठी- एसबीआय अहवाल

SBI रिसर्चच्या एका अहवालात म्हटले आहे की, नागरिकांच्या दायित्वांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्याचा थेट संबंध मालमत्ता आणि वाहने यासारख्या भौतिक मालमत्तांच्या निर्मितीशी दिसून येत आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन वर्षांत घरांना 50 टक्क्यांहून अधिक किरकोळ कर्ज हे घर, शिक्षण आणि वाहन खरेदीसाठी दिले गेले आहे. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)

पारंपरीक बचत पद्धतीला फाटा

एसबीआयच्या अहवालात पुढे अधोरेखित करण्यात आले आहे की, कमी व्याजदरामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये घरगुती आर्थिक बचतीचे घरगुती भौतिक बचतीमध्ये बदल झाले. थोडक्यात, आर्थिक बचतीत लक्षणीय घट झाली असली तरी, भौतिक मालमत्तेच्या निर्मितीवर होणारा वाढीव खर्च, विशेषत: रिअल इस्टेट क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि मालमत्तेच्या किमतीत झालेली वाढ या रुपात पाहायला मिळते.