RBI New Rule: Auto-Debit नियमात बदल; 1 ऑक्टोबर पासून लागू होणार नवा नियम
1 ऑक्टोबरपासून ऑटो पेमेंट नियमात बदल होत आहेत. आरबीआयने नवे नियम लागू केले आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आणि डीटीएच सेवा (DTH Service) वापरणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून ऑटो पेमेंट नियमात बदल होत आहेत. आरबीआय (RBI) चा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) किंवा डीटीएच रिचार्जसाठी अनेकजण क्रेडिट कार्ड पेमेंट (Credit Card Payment), यूपीआय पेमेंट (UPI Payment) सह ऑटो पेमेंट सेवा वापरतात. मात्र आता ऑटो डेबिट पेमेंट (Auto Debit Payment) च्या नियमांमधील बदल झाला असल्याने तो जाणून घेणे गरजेचे आहे. (RBI New Rule: आरबीआयच्या 'या' नियमात केला मोठा बदल, 1 ऑक्टोंबरपासून लागू होईल नवीन नियम)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार, 1 ऑक्टोबरपासून ऑटो पेमेंट सेवा बंद केली जात आहे. त्यामुळे असे पेमेंट करण्यासाठी आरबीआयने अतिरिक्त एएफए अर्थात अॅडिशन फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया जोडली आहे. आरबीआयचे हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभरात लागू केला जाणार आहेत. (येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार रेस्टॉरंटच्या बिलासाठी नवा नियम, मान्य नसल्यास केली जाणार कठोर कार्यवाही)
ऑटो पेमेंटमध्ये अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन जोडले गेले आहे. याचा अर्थ, ऑटो पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म आणि बँकेद्वारे ऑटो पेमेंटबद्दल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला रिचार्ज चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला ऑटो पेमेंटला परवानगी द्यावी लागेल. यापूर्वी ऑटो पेमेंटआधी मेसेज येत नव्हता. AFA नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आला. मात्र त्यावर 6 महिन्यांची सूट आरबीआयकडून देण्यात आली. परंतु, आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.