येत्या 1 डिसेंबरपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित होणार 'हे' महत्त्वाचे बदल, रेल्वेतही होणार मोठा बदल
हे नियम पैसे ट्रान्सफर करण्याशी संबंधित आहे.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला देशात आर्थिक व्यवहारांशी संबंधित वा अन्य जीवनावश्यक सोयी-सुविधांमध्ये महत्त्वाचे बदल होत असतात. त्यात वर्षाच्या सुरुवातीस आणि वर्षाअखेरीस देशात अनेक बदल होतात. नवनवीन नियम येतात. यंदा ही 1 डिसेंबरपासून (December) देशात नवनवीन बदल होणार आहेत. यात RTGS, विमा प्रीमियम (Premium), रेल्वे (Railway) आणि एलपीजी गॅस (LPG) मध्ये नवे बदल होणार आहेत. त्यामुळे वर्षाची सुरुवात कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूने झाली मात्र शेवट सरकारच्या काही चांगल्या निर्णयामुळे गोड होतोय का हे पाहायचय.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम पैसे ट्रान्सफर करण्याशी संबंधित आहे. पाहूयात सविस्तर
1. RTGS
RBI ने 1 डिसेंबरपासून RTGS 24X7 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. यामुळे तुम्ही कधीही पैसे ट्रान्सफर करु शकतात. सध्या RTGS दुसरा आणि चौथा शनिवार वगळता अन्य दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.हेदेखील वाचा- School Reopen In Maharashtra: राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग आजपासून सुरु; मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरात शाळा बंदच
2. LPG गॅस
एलपीजी गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता.
3. नवीन रेल्वे
1 डिसेंबरपासून नवीन एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. यात झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोघांचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.
4. प्रीमियममध्ये बदल करु शकता
आता 5 वर्षानंतर तुम्ही विमाधारक प्रीमियमची रक्कम 50%नी कमी करता येईल. म्हणजेच अर्धा हफ्ता देऊन तुम्ही पॉलिसी सुरु ठेवू शकता.
1 डिसेंबरपासून होणारे हे बदल दिलासादायक असून LPG गॅस च्या किंमतीत काय बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी नागरिकांनी हे नियम ध्यानात ठेवून त्यानुसार तरतूद करावी.