केंद्र सरकार करणार 2000 टन कांद्याची आयात; लासलगाव बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी नवा मार्ग
केंद्र सरकार कांद्याची आयात करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या MMTC Ltd कंपनीकडून 2000 टन कांद्याची आयात करण्यासाठी एक निविदा जाहीर करण्यात आली आहे.
Onion Price Raise : आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजेच लासलगाव बाजारात (Lasalgaon) मागील काही दिवसांपासून कांद्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी देशात अनेक ठिकाणी कांद्याचे भाव गगनाला भिडल्याचे पाहायला मिळतेय. अजूनही परिस्थितीमध्ये समाधानकारक बदल होत नसल्याने आता अखेरीस केंद्र सरकार कांद्याची आयात करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या MMTC Ltd कंपनीकडून 2000 टन कांद्याची आयात करण्यासाठी एक निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी टन मागे $352 इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी आहे. साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ही आयात केली जाईल.
मागील काही दिवसात एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा सातत्याने कांद्याचे भाव वाढतात होते, परिणामी देशात एका वेळी कांद्याने शंभरी गाठल्याचे देखील समजत होते. ही मागील चार वर्षातील सर्वात अधिक दरवाढ असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली होती. (कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध; वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न)
यंदा दाक्षिणात्य भागात पावसामुळे कांद्याच्या शेतीवर वाईट परिणाम झाला होता ज्यामुळे साहजिकच कित्येक दिवस कांद्याचा तुटवडा भासत होता. तर उत्तरेकडील राज्यात देखील खरीप पैकी अजून बाजारात आली नसल्याने सामान अवस्था ओढवली होती.
दरम्यान, कुठेही कांद्याचा काळाबाजार किंवा अनधिकृत साठवणूक होऊ नये याची दक्षता घेण्यात आली असून, रिटेल मार्केट मध्ये व्यापाऱ्याला एकावेळी केवळ 100 क्विंटल तर होलसेल मार्केट मध्ये एकावेळी 500 क्विंटल इतकाच कांदा बाळगता येणार आहे. तसेच केंद्र सरकारतर्फे सर्व राज्यांना एक पत्रक पाठवण्यात आले होते, ज्यानुसार कांद्याचा तुटवडा भासत असल्यास केंद्राकडे सूचना द्याव्या या मागण्या तातडीने पूर्ण केल्या जातील असे सांगण्यात आले होते, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता आयतीच मार्ग अवलंबला जात आहे.