7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्यांना 1 जुलै पासून थकीत DA मिळण्याची शक्यता; पगारात होणार 'इतकी' वाढ
सध्या 1 जानेवारी 2020, 1जुलै 2020 , 1 जानेवारी 2021 अशा तीन टप्प्यातील प्रलंबित डीए मधील वाढीची केंद्रीय कर्मचार्यांना प्रतीक्षा आहे.
केंद्र सरकारने (Central Government) मार्च 2021 मध्ये जाहीर केल्यानुसार त्यांच्या लाखो कर्मचारी (Central Employees) आणि निवृत्तीधारकांना (Pensioners) गोठवलेला डीए (DA) अर्थात महागाई भत्ता (Dearness Allowance) आता 1 जुलै 2021 पासून मिळणार आहे. सध्या देशात कोविड 19 ची दुसरी लाट असल्याने या सार्यांनाच त्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. याबाबतची एक केंद्रीय स्तरावरील बैठक आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांचा डीए हा 17% आहे तो वाढवून 28% होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना मोठा फायदा होणार असल्याचं चित्र आहे. (नक्की वाचा: 7th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचार्यांना अजून एक खूषखबर; Pay Fixation Deadline ला मुदतवाढ)
Minister of State for Finance अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचे थकीत 3 हप्ते 1 जुलै 2021 पासून पुन्हा सुरळीत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देशात आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी खासदार, आमदार यांच्याश पंतप्रधाम , राष्ट्रपती आणि राज्यापालांनी आपल्या वेतनाचा विशिष्ट भाग मदतनिधीमध्ये गोळा केला होता. यावेळेस सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचे देखील डीए गोठवले होते. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना हे गोठवलेले डीए देखील पुन्हा हप्तांमध्ये देण्यासाठी सरकार विचार करत असल्याचं अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत अधिवेशनादरम्यान लेखी उत्तराद्वारा स्प्ष्ट केले आहे.
केंद्रीय कर्मचार्यांच्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात कर्मचार्यांच्या वेतनामध्ये डीए एका ठराविक प्रमाणात वाढवला जातो. सध्या 1 जानेवारी 2020, 1जुलै 2020 , 1 जानेवारी 2021 अशा तीन टप्प्यातील प्रलंबित डीए मधील वाढीची केंद्रीय कर्मचार्यांना प्रतीक्षा आहे.