Mumbai Central Railway: प्रवासांच्या सुरक्षिततेसाठी मध्यरेल्वे कडून निर्बंध; जाणून घ्या कोणत्या स्थानकांवर

गर्दी नियंत्रणात यावी याकरिता मध्यरेल्वेने निर्बंध घातले आहे.प्रवासांनी पर्यायी करून ठेवण्याचे आदेश मध्य रेल्वे कडून दिला आहे.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

Mumbai Central Railway: ट्रेन म्हटलं की डोळ्यासमोर येत ती लोकांची अफाट गर्दी. त्याच गर्दीचा सामना करण्यासाठी आणि प्रवासांची सुरक्षिता वाढवण्यासाठी मुंबई विभागाच्या (Central Railway) मध्य रेल्वेने काही निर्णय घेतले आहे. 16 जून पासून प्रमुख स्थानकांवर विशिष्ट वेळेत प्लॅटफाॅर्म तिकीटांच्या विक्रिवर तात्पुरते निर्बंध लावण्याचे निर्णय घेतले आहे. मध्य रेल्वेने प्रवासांची गर्दी नियंत्रणात यावी याकरिता हे नियम लागू केले आहे. मुबंई विभागातील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल सांयकाळ पासून ते रात्री पर्यंत प्लॅटफाॅर्म तिकिट बंद असणार आहे.

ह्या निर्बंधानुसार सर्व सामान्या जनतेसाठी विशिष्ट कालावधी दरम्यान प्लॅटफाॅर्म तिकिट उपलब्ध होणार नाही. सीएसएमटी आणि दादर येथे सांयकाळी 6 ते 12.30, ठाणे येथे संध्याकाळी 7 ते 1.30, कल्याण स्थानकावर संध्याकाळी 6 ते 1.30, एलटीटी स्ठानकावर 6.30 ते रात्री 1 वाजे पर्यंत आणि पनवेल स्थानकावर रात्री 11 ते मध्य रात्री 2 पर्यंत मर्यांदा असणार आहे. (हेही वाचा- आता तुम्ही सहज हस्तांतरित करू शकता रेल्वे तिकीट

मध्य रेल्वेच्या अधिकाराच्या माहितीनुसार लहान मुलासोबत असणाऱ्या महिलांना, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सुट देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ व्यवस्था मिळावी याकरिता निर्बंध लावले आहे. अधिकारांनी प्रवासांना त्यांच्या प्रवासाचे सुलभ नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.  आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रतिबंधित तासांमध्ये पर्यायी व्यवस्था करून ठेवावी असेही सांगितले आहे.