CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी यूपी मधील मृतांचा आकडा 15 वर पोहचला
तर यूपी येथील विविध ठिकाणासह कानपूर आणि रामपूर येथे शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला हिंसेचे वळण लागत प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला जात आहे. तर यूपी येथील विविध ठिकाणासह कानपूर आणि रामपूर येथे शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला हिंसेचे वळण लागत प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अनधिकृत माहितीप्रमाणे मृतांचा आकडा 11 असल्याचे बोलले जात आहे. तर हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर इंटरनेटची सुविधा येत्या सोमवार पर्यंत 22 जिल्ह्यात बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आली आहे.
प्रविण कुमार, पोलीस महानिरीक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जणांचा डिसेंबर 10 या दिवसापर्यंत मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृत व्यक्ती बिजनोर, संबल, फिरोझाबाद, कानपूर, वाराणसी आणि मेरुत येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. हाथी खाना चौक येथे आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला.(केंद्र सरकारकडून सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- सोनिया गांधी)
Tweet:
शुक्रवारी सहा जणांचा आणि शनिवारी 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर चार जणांचा मेरुत जिल्ह्यात मृत्यू झाला असून या मध्ये एका मुलाने त्याचा जीव गमावला आहे. तर बिजनोर मधील 2 आणि लखनौ येथील 1 आणि रामपूर मधील ही 1 व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंसाचार घडत असल्याने यूपीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 705 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 263 पोलीस कर्मचारी या आंदोलनामुळे जखमी झाल्याचे यूपी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.