CAA Protest: दिल्लीतील गोकुलपुरी येथे गोळीबारात 1 हेड कॉन्स्टेबल ठार, डीसीपी जखमी; अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे मदतीची मागणी

दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत.

Clashes in Maujpur | (Photo Credits: ANI)

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरुद्ध दिल्ली (Delhi) मध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनाला आता अधिकच हिंसक वळण येत आल्याचे समजत आहे. दिल्लीतील जाफराबाद (Jafrabaad) येथे मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले असून  दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या हिंसक आंदोलनात दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत.याशिवाय आंदोलकांनी नेमौजपूर (Naimojppur) भागात दोन घरंही पेटवली. दिल्लीतील परिस्थिती बिघडत असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal)  यांनी केंद्र सरकरकडे मदतीची मागणी केली आहे. "दिल्लीच्या काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि नायब राज्यपाल यांनी याची दखल घ्यावी आणि शांतता निर्माण करण्यासाठी मदत करावी, असं केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितलं.

प्राप्त माहितीनुसार, सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक स्वरुप येताच जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले मात्र तरीही न ऐकल्याने अखेरीस अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थिती ही आटोक्यात- केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला; 24 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

ANI ट्विट

अरविंद केजरीवाल ट्विट

दरम्यान, दिल्लीत खबरदारी म्ह्णून आता मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत.तसेच प्रशासनाने पूर्वोत्तर दिल्लीतील 10 जिल्ह्यांमध्ये सीआरपीसी कलम 144 अंतर्गत संचार बंदी लागू केली आहे.