Andhra Pradesh Accident: दुर्दैवी! आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात बस आणि ऑटोची धडक; 7 जणांचा मृत्यू
या अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनंतपूर जिल्ह्यातील (Anantapur District) गारल्डिन मंडळातील थलागासपल्लेजवळ आंध्र प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एपीआरटीसी) बस आणि ऑटोची धडक (RTC Bus Collided with Auto) झाली. ऑटोमध्ये शेतमजूर प्रवास करत होते. या अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्तालुरू मंडलातील नेलुताला गावातील सुमारे 12 शेतमजूर गार्डीनमध्ये कामावर गेले होते. ते परतीच्या प्रवासात ऑटोने जात होते. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एपीआरटीसी बसने ऑटोला धडक दिली. अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Telangana Road Accident: तेलंगणामध्ये नगरकुर्नूल इथं ट्रॅक्टरला धडकल्यानंतर स्कूल बस उलटली; 5 विद्यार्थी जखमी (Watch Videos))
दरम्यान, जिल्हा एसपी जगदीश आणि डीएसपी व्यंकटेश्वरुलू यांनी घटनास्थळाची धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी एपीआरटीसी बस चालकाला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे. (हेही वाचा - Lucknow Accident Video: भरधाव कार आणि स्कूटरची जोरदार धडक, 2 जण गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल)
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची भरपाई जाहीर -
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तथापी, जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.