IPL Auction 2025 Live

दिल्ली हिंसाचारावर आज संसदेत चर्चा; काँग्रेस लावून धरणार अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी काँग्रेस (Congress) कडून दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा उचलून यावरून गृहमंती अमित शहा (Amit Shah) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि त्यातून सुरु झालेल्या जातीय वादाने मागील दोन महिन्यांपासून राजधानी दिल्ली (Delhi) येथे भीषण परिस्थिती उद्भवली आहे. शाहिनबागेत (Shaheenbagh) सुरु असणारी आंदोलने, ईशान्य दिल्लीत झालेला हिंसाचार, या मुद्द्यांवरून जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण झाली आहे. अशातच आज दिल्ली मध्ये संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा (Budget Session) दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यावेळी काँग्रेस (Congress) कडून दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा उचलून यावरून गृहमंती अमित शहा (Amit Shah) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे. याप्रकरणी काँग्रेस लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात तहकुबी सूचना मांडली जाणार आहेत. संसदेचे हे अधिवेशन 3 एप्रिल पर्यंत असणार आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार; शरद पवार यांचा आरोप

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली मधील जातीय दंगलीचा मुद्दा उपस्थित करून हा हिंसाचार का झाला यावर तातडीने चर्चा व्हावी अशी मागणी केली जाईल अशी माहिती काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.दिल्लीत केंद्र सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे हे स्पष्ट दिसून येतेय तसेच काही प्रसंगातून दंगलखोर, पोलीस अधिकारी हे एकमेकांना सहाय्य करत होते असे भासतेय. जाळीपोलीमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मांडली जाणार आहे.  Delhi Violence: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, हिंसाचारादरम्यान घरे खाक झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सुरु होणाऱ्या अधिवेशनात दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि सरकार मध्ये खडाजंगी होण्याची पूर्ण शक्यता आहे.