Budget 2020: निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना मोडला स्वतःचाच रेकॉर्ड पण दोन पाने शिल्लक ठेवून संपवले भाषण, वाचा सविस्तर

मात्र भाषण पूर्ण होण्याच्या काहीच वेळ आधी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आटोपते घ्यावे लागले.

Finance Minister Nirmala Sitharaman. (Photo Credits: Twitter)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा अर्थसंकल्प (Budget 2020)  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत मांडला.अर्थसंकल्प सादर करत असताना आज सीतारामन यांनी आपलाच रेकॉर्ड मोडत तब्बल 2 तास 41 मिनिटे भाषण केले. मात्र भाषण पूर्ण होण्याच्या काहीच वेळ आधी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आटोपते घ्यावे लागले. पीटीआयच्या माहितीनुसार, भाषण सुरु असताना सीतारामन यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना अचानक घाम फुटून अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बसण्यास सांगितले. मात्र यामुळे भाषणावर काहीही परिणाम झाला नसून शेवटची केवळ दोन पाने वाचणे शिल्लक होती असे सीतारामन यांनी सांगितले आहे. आजच्या दिवसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 

लोकसभा निवडणुकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा दुसरा अर्थसंकल्प आहे. याबरोबरच, त्यांचे आजचे भाषण हे त्यांनी या पूर्वी केलेल्या भाषणाहून मोठे होते. म्हणजेच त्यांनी भाषणाचा स्वत:चाच विक्रम मोडला आहे. गेल्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी दोन तास, 17 मिनिटे भाषण केले. यंदा त्यांनी आपले भाषण 2 तास 41 मिनिटांवर थांबवले.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी ते बळीराजासाठी, नोकरदारांसाठी अनेक योजना सीतारामन यांनी मांडल्या आहेत. शेअर बाजाराला मात्र सीतारामन यांचा अर्थसंकल्प फारसा रुचलेला नाही. शेअर बाजारात सकाळपासूनच मरगळ पाहायला मिळाली. दुपारपर्यंत सेन्सेक्स 1  हजार अंकांनी गडगडला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif