#Budget2019: केंद्र सरकारने मध्यमवर्गाला अर्थसंकल्पात मोठी भेट दिली. नागरिकांचे 5 लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. दीड लाख रुपयांची बचतही पूर्णपणे टॅक्स फ्री राहणार आहे. या पद्धतीने बचक केल्यास मध्यमवर्गाला 6.5 लाख रपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री राहणार आहे. सरकारच्या या घोषणेचा फायदा सुमारे 3 कोटी मध्यमववर्गीय करदात्यांसाठी मिळणार आहे. या करदात्यांना करसवलत मिळणार आहे.
वेतनउभोक्त्याचे स्टॅंडर्ड टॅक्स डिडक्शनम 40,000 रुपयांऐवजी वाढवत 50000 रुपये इतके करण्यात आले आहे. बँक आणि पोस्ट ऑफिस डिपॉझिट च्या 10000पेङा अधिक व्याज टीडीएसवर लागत होते. ही रक्कम वाढवून 40000 रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, 'एक पांव रखता हूं, हजार राहें फूट पड़ती हैं' अशा कवितेच्या ओळी उच्चारत कॅबिनेट मंत्री पियुष गोलय यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण संपवले.
2018/19 च्या तुलनेत 2020/21मध्ये खर्चात 13 टक्क्यांची वाढ होईल. यात व्यक्तिगत खर्च 336293 रुपये होईल, एससी आणि एसटी वर्गाच्या कल्याणासाठी 2018/19 मध्ये 56,619 कोटी रुपयांचे उद्दीष्ट होते. 2018/19मध्ये 62474 रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना देण्यात आलेला इनकम सपोर्ट डोळ्यासमोर ठेऊन जीडीपीनुसार वित्तीय तूट आगामी वर्षासाटी 3.4 टक्के होईल.
#Budget2019: जानेवारी 2019 मध्ये जीएसटी कलेक्शनचा आकडा सुमारे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढला. पाच कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेले व्यापारी, ज्यांचा जीएसटी (GST) भरण्यात जवाळपास 90 टक्के सहभाग आहे, त्यांना तिमाही रिटर्न देण्यासाठी मान्यता देण्यात येईल: पियुष गोयल
मध्यमवर्गांला धक्का: इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. तसेच, कॉर्पोरेट टॅक्स स्लॅबमध्येही कोणतेही बदल नाहीत: पियुष गोयल
#Budget2019: देशात करभरना वाढला आहे. आयकर विभाग आता ऑनलाईन पद्धतीने काम करतो. त्यामुळे कामाचा उराकाही वाढला असून, देशातील करभरणा वाढला, आयकर विभागाने सुमारे 99.54 टक्के आयटीआर फाईल्सना मान्यता दिली: पियुष गोयल
#Budget2019: #Budget2019: देशात प्रतिदिन 27 किलोमिटर या वेगाने महामार्ग बांधले जात आहेत. जगाच्या तुलनेत महामार्ग बनविण्याचा वेग भारतात अधिक गतिमान. अनेक दशकं रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत: पियुष गोयल
#Budget2019 : गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर, मोबाईल डेटा वापरात तब्बल 50 पटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोबाईल डेटा दर हे जगाच्या तुलनेत भारतात अत्यालप आहेत - पियुष गोयल
#Budget2019: सर्वांसाठी आनंदाची माहिती आहे की, यंदाचे संरक्षण बजेट हे तब्बल 3 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक असेल. वन रँक वन पेन्शन योजनेंतर्गत जवानांना 35000 कोटी रुपये मिळाले - पियुष गोयल
#Budget2019: उज्ज्वल योजनेंतर्गत तब्बल 8 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी सुमारे 6 कोटी एलपीजी कनेक्शन आगोदरच देण्यात आली आहेत. मुद्रा योजना अंतर्गत 75 टक्के महिलांना लाभ मिळाला - पियुष गोयल
आयुष्यमान योजना आयुष्यमान योजनेंतर्गत अल्पावधीतच 10 लाख लोकांना फायदा मिळेल. आतापर्यंत या सर्व नागरिकांकडे 3000 कोटी रुपयांची बचत झाली आहेत - पियुष गोयल
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेची घोषणा, या योजनेंतर्गत 15000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी 3000 रुपयांची सेवानिवृत्ती (पेन्शन) मिळेल. सुमारे 10 कोटी असंघटीत कार्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा सरकारचा दावा.
कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेकऱ्यांना 2 टक्के आणि वेळवेर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सहकार्य मिळणार. पशुपालन आणि मात्स्यसंवर्धन आदींशी संबंधीत शेतकऱ्यांच्या कर्जात 2 टक्क्यांचे व्याज सहकार्य. राष्ट्र्रीय गोकुळ मिशनसाठी निधीत वाढ. 750 कोटी रुपये मिळणार निधी
आमच्या महेनती शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचे फळ योग्य पद्धतीने मिळत नव्हते. आमच्या सरकारने इतिहासात पहिल्यांदा 22 पिकांचा हमीभाव खर्चापेक्षा 50 टक्क्यांनी अधिक वाढवला. आमच्या सरकारने शेतऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. - पियुष गोयल
आंतरराष्ट्रीय बाजारात किमती घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे 'शेतकरी सन्मान' निधीची घोषणा करण्यात आली आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होईल. या योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना होईल. ही योजना भारत सरकारकडून देण्यात येईल. ही योजना 12 कोटी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू होईल. - पियुष गोयल
शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारने यंदा 25 कोटी रुपयांचा निधी 2019-20 या वर्षासाठी निर्धारीत केला आहे.
सौभाग्य योजने अंतर्गत सरकारने देशातील जवळपास सर्व कुटुंबांना वीज मोफत दिली. आम्ही तब्बल 143 कोटी एलईडी बल्ब उपलब्ध करुन दिले. वर्ष 2014 -18 या काळात पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत 1.53 घरे उपलब्ध करुन दिली.
सरकारने गावांच्या गावपणाला जराही धक्का न लावता विकास केला. सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या. आयुषमान योजनेमुळे गोरगरिबांचे 3 हजार कोटी रुपये वाचले. आम्ही जी स्वप्नं जनतेला दाखवली ती पूर्ण केली. 143 एलईडी दिवे दिले.
देशातील सर्व सुविधा, मलमत्ता आणि संसाधनांवर पहिला हक्क गरिबांचा. म्हणूनच सरकारने आर्थिक स्थिती हालाकीची असणाऱ्या सर्वसामान्य वर्गाला दहा टक्के आरक्षण, मनरेगा यांसाठी आणि खाद्य अनुदान वाढवले - पियुष गोयल
करप्रणाली आणि बँकांच्या कार्यप्रणालीत मोठी सुधारणा झाली. त्याचा परिणाम देशातील भ्रष्टाचार थांबण्यावर झाला. राज्यांना या आधीच्या तुलनेत 10 टक्के अधिक निधी केंद्राकडून मिळू लागला - पियुष गोयल.
Budget 2019: मोदी सरकारच्या कारर्दीतील आणि लोकसभा निवडणूकी पूर्वीचे यंदाचे हे शेवटचे बजेट असून आज अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) अंतरिम बजेट (Interim Budget) सादर करतील. 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आहे. निवडणूकीपूर्वीचे हे शेवटचे बजेट असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.
काँग्रेसचा देशातील वाढता बोलबाला पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती देण्यात येतील, अशी आशा आहे. शेतकऱ्यांसाठी 70 हजार कोटी ते एक लाख कोटी रुपयांपर्यंतची रक्कम राखीव ठेवण्यात येईल. तसंच हा अर्थसंकल्प महिलांसाठीही खास असण्याची अपेक्षा आहे. महिलांसाठी नव्या योजना आणि सुविधांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात येईल.
सेन्सेक्स, निफ्टी वधारला
अर्थसंकल्पापूर्वी बॅंकीक, वाहन, फार्मा, आयटी आणि एफएमसीजी शेअरमध्ये वाढ झाल्याने गुरुवारी मुंबई शेअर सेन्सेक्समध्ये 665.44 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये सुमारे 179.15 अंकांची वाढ झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 10,800 या अंकावर पोहचला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)