BSNL-MTNL कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले, देशव्यापी आंदोलनाची धमकी

याच कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या समोर वेतन बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असून दोन्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाचा धमकी दिली आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतीय शासकीय टेलिकॉम कंपनी संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) मधील कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडवून ठेवले आहे. याच कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या समोर वेतन बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असून दोन्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाचा धमकी दिली आहे. त्यामुळे जर दिवाळीनंतर संपूर्ण वेतन न मिळाल्यास संपूर्ण देशभरात आंदोलन करु असा इशारा दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या युनियन नेत्यांनी असे म्हटले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. एमटीएनएल युनियन आणि संघाचे संयोजन धर्मराज सिंह यांच्या हवालानुसार वृत्तपत्राने असे लिहिले की, दिवाळीपूर्वी आंदोलन करणे योग्य आहे का? जर लवकर या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यास आम्ही शांत बसणार नाही. याचा विरोधत आम्ही सर्व कर्मचारी पंतप्रधान कार्यालयापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ असे म्हटले आहे. (आर्थिक मंदीचा फटका बसल्याने BSNL आणि MTNL बंद करण्याचा अर्थमंत्रालयाचा सल्ला, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात)

तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनासोबत एमटीएनएल कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 ते 50 वर्षापर्यंत बदली करण्यात येऊ नये अशी मागणी करत आहेत. त्याचसोबत एमटीएनएल आणि बीसएएनएल यांच्या विलिकरणाला ही कर्मचाऱ्यांकडू जोरदार विरोध केला जात आहे. अर्थमंत्रालयाने दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष कमी करुन 58 वर्ष करण्यासाठी सांगण्यात आले आहे.  जर दोन्ही कंपन्या जर बंद करायच्या झाल्यास त्यासाठी 95,000 करोड रुपये खर्च करावे लागणार आहेत. या रकमेत दोन्ही कंपन्यांमधील सुमारे 1 लाख 6 हजार कर्मचा-यांसाठी सक्तीची निवृत्ती योजना राबविली जाणार आहे. या कर्मचा-यांना पगार कमी असेल तसेच पूर्ण कर्मचारी वर्गात या कर्मचा-यांचे प्रमाण 10 टक्के असेल तर अशा कर्मचा-यांना सक्तीची निवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील आयटीएस अधिका-यांना अन्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif