Wrestler Protest: ब्रिजभुषण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार पण पत्रकार परिषदेत करणार मोठा खुलासा

ब्रिजभुषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मी राजीनामा देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य ब्रिजभुषण सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.

देशात गेल्या दोन दिवसांपासून कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चिघळताना दिसत आहे. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह तब्बल ३० कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघ आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भुषण सिंह विरोधात आंदोलन पुकारलं आहे. महिला कुस्तीपटूंच होणार शोषण आणि मानसिक छळ विरोधात देशातील कुस्तीपटूंनी हल्ला चढवला आहे. तरी जंतर मंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असुन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याचबरोबर कुस्तीपटूंनी इंडियन ऑलिम्पिक असोशिएशनकडे यासंबंधीत तक्रार दाखल केली आहे. तरी याप्रकरणी इंडियन ऑलिम्पिक असोशिएशनने यासंबंधीत तपास करणारी एक कमिटी बनवावी, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांनी राजीनामा द्यावा आणि कुस्ती महासंघ चालवण्यास नवी कमेटी बनवावी अशी मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी इंडियन ऑलिम्पिक असोशिएशनकडे केली आहे.

 

तरी ब्रिजभुषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मी राजीनामा देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य ब्रिजभुषण सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे. तसेच ब्रिजभुषण सिंह यांना उत्तर देण्यास २४ तासांचा वेळ दिला असुन आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत या संबंधी स्पष्ट मत व्यक्त करणार आहेत. तसेच ब्रिजभुष सिंह म्हणाले कुणाच्या दयेमुळे मी कुस्ती महासंघाचा अध्यक्ष नाही तर माझी अधिकृतरीत्या या पदासाठी निवड केली गेली आहे. म्हणून मी या पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं उपस्थित होत नाही. (हे ही वाचा:- Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंनी साधला IOA कडे संपर्क; WFI चे अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्या विरोधात दिली लेखी तक्रार)

 

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, हा संपूर्ण प्रकार एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून होत आहे. तरी राजीनाम्या संबंधी खुद्द ब्रिजभुषण सिंह, उत्तर प्रदेश सरकार आणि भाजप काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी दुपारी चार वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. 22 जानेवारीला अयोध्येत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर या प्रकरणी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.