Ludhiana Murder Case: मेरठ नंतर आता लुधियाना मध्ये निळ्या ड्रम मध्ये सापडला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

मृतदेह ज्या पद्धतीने गुंडाळण्यात आला होता आणि लपवण्यात आला होता, त्यावरून अधिकाऱ्यांना संशय आहे की हा गुन्हा पूर्वनियोजित असावा आणि त्या परिसराशी परिचित असलेल्या कोणीतरी तो घडवून आणला असावा.

Representational Image (File Photo)

मेरठच्या खून प्रकरणानंतर (Meerut Murder Case) आता तशाच प्रकारे निळ्या ड्रम मध्ये कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह पंजाब मधील लुधियाना (Ludhiana) येथे सापडला आहे. शेरपूर  भागात या 40 वर्षीय पुरूष मृतदेहाची मान आणि पाय बांधलेले आहेत. त्यामुळे हा खून केला गेला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या ड्रम मधून जेव्हा दुर्गंधी जेव्हा पसरायला लागली तेव्हा शोध सुरू झाला आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) कुलवंत कौर यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, तो माणूस स्थलांतरित असल्याचे दिसून आले.

"चेहऱ्यावरील फीचर्सवरून मृत व्यक्ती स्थलांतरित असल्यासारखी दिसते. सध्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत, मात्र अवस्था वाईट आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल," असे सांगण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठवण्यात आला आहे.

तपास अधिकाऱ्यांनी लुधियानामधील तब्बल 42 ड्रम उत्पादन युनिट्सची यादी तयार केली आहे. ज्या युनिटमध्ये मृतदेह आढळला तो युनिट अगदी नवीन असल्याचे दिसून आले, ज्यामुळे पूर्वनियोजित खून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Youths Die of Poisonous Gas in Well: मध्य प्रदेशात मोठी दुर्घटना! विहिरीत पडलेल्या गायीला वाचवण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा विषारी वायूमुळे मृत्यू .

पोलिसांनी घटनास्थळापासून 5 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. शहरातील कॅमेरे, रेल्वे स्थानके आणि बस स्टँडमधील फुटेजची तपासणी केली जात आहे. याव्यतिरिक्त, पोलिस मार्गाचा मागोवा घेत आहेत आणि अनेक संशयास्पद वाहन नोंदणी क्रमांक तपासत आहेत.

गुन्हेगारीच्या ठिकाणी अनेक स्थलांतरित राहतात आणि त्यांचीही चौकशी केली जात आहे. मृतदेह ज्या पद्धतीने गुंडाळण्यात आला होता आणि लपवण्यात आला होता, त्यावरून अधिकाऱ्यांना संशय आहे की हा गुन्हा पूर्वनियोजित असावा आणि त्या परिसराशी परिचित असलेल्या कोणीतरी तो घडवून आणला असावा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement