Board Exam Cheating Viral Video: बोर्डाच्या परिक्षेत कॉप्यांच्या सुळसुळाट, परिक्षा केंद्रावर पालकांचा जीवघेणा प्रकार

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे पालक, मित्र मंडळी त्यांना कॉप्या पुरवत असल्याचे दिसत आहे.

borad Exam Cheating PC TWITER

Board Exam Cheating Viral Video: राज्यभरात बोर्डाचे पेपर चालू आहेत. दरम्यान परिक्षांमध्ये कॉप्या करतानाचा सुळसुळाट आढळून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे पालक, मित्र मंडळी त्यांना कॉप्या पुरवत असल्याचे दिसत आहे. मुलांच्या भविष्यावर मोठा प्रश्न चिन्हा उभा राहिला आहे. परिक्षेत गैरप्रकार घडून येत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा- बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी बनला नकली पोलिस, परिक्षा केंद्रावर उघडला रहस्य

मिळालेल्या माहितीनुसार, व्हारयरल झालेला व्हिडिओ हा हरियाणा येथील असल्याचे समोर येत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, लोक आपल्या पाल्यांना कॉप्या पुरवण्यासाठी शाळेच्या इमारतीवर चढले आहेत. बोर्डाच्या परिक्षेत सर्रासपणे कॉपी होताना देखील परिवेक्षक कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.परिक्षा केंद्राच्या इमारतीत एका भिंतीवर चढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने खिडकी पर्यंत पोहचून कॉप्या पूरवत आहे.

ही घटना हरियाणा येथील नूह जिल्ह्यातील तवाडूच्या चंद्रावती शाळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान परिक्षेच्या आधी पेपर फुटल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओत विद्यार्थ्यांचे पालक, मित्र जीव धोक्यात घालून कॉप्या पुरवत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे.