New Faces For CM Posts: भाजप चेहरा बदलण्याच्या तयारीत? तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, या वेळी नेतृत्वा काय निर्णय घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. भारतीय जनता पक्ष हा अलिकडच्या काळात धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडच्या (Chhattisgarh) विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय जनता पक्ष (BJP) या केंद्रस्थानी असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांचा विचार करत आहे. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा निवडताना सहाजिकच लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊनच विचार केला जाणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या-जाणत्या आणि परिचीत चेहऱ्यांवरच भाजप डाव लावणार की, नव्या चेहऱ्यांना संधी देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र, या वेळी नेतृत्वा काय निर्णय घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
PM मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. जी जवळपास साडेचार तास चालली. ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि भाजप प्रमुख जेपी नड्डा यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली. या बैठकीत तीन राज्यांतील मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असलेल्यांचे मूल्यांकन करण्यावर भर देण्यात आला. बैठकीमध्ये शहा आणि नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रदेश प्रभारींसोबत स्थानिक नेत्यांचा अभिप्राय गोळा करण्यासाठी सल्लामसलत झाली. केंद्रीय नेतृत्व लवकरच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसाठी निरीक्षकांची नियुक्ती करेल अशी चर्चा आहे. हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या विधानसभा नेत्यांची निवड करण्यावर भर देतील. (हेही वाचा, Revanth Reddy is Next Telangana CM: रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री, 7 डिसेंबर रोजी घेणार शपथ, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी)
मध्य प्रदेशमध्ये चेहरा कोण?
मध्य प्रदेशात, संभाव्य मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांमध्ये विद्यमान शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि नरेंद्र सिंह तोमर तसेच ज्येष्ठ राज्य नेते कैलाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे. (हेही वाचा: DMK MP Gaumutra State Remark: 'भाजप फक्त गोमूत्र राज्य जिंकत आहे, त्यांना दक्षिणेत येऊ देणार नाही'; द्रमुक नेते S. Senthilkumar यांचे वादग्रस्त वक्तव्य)
राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्याचा शोध
राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी आणि उल्लेखनीय नेते दिया कुमारी आणि महंत बालकनाथ यांच्यासह अनेक दावेदार आहेत.
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह दावेदार
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे दावेदारांमध्ये दिसत आहेत, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण कुमार साओ, विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक आणि माजी आयएएस अधिकारी ओ पी चौधरी यांचा समावेश आहे.
एक्स पोस्ट
महत्त्वाचे असे की, कितीही दावे-प्रतीदावे आणि अटकळ लावली तरी, भारतीय जनता पक्ष हा अलिकडच्या काळात धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. अशा वेळी या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची माळ भाजप कोणाच्या गळ्यात घालने याबाबत आगोरच भाष्य करणे कठीण आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)