राहुल गांधींचा आरोप- भारतात Facebook, WhatsApp वर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण आहे, पसरवतात खोट्या बातम्या आणि तिरस्कार
ते म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) नियंत्रण करतात.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) नियंत्रण करतात. त्यांनी त्या माध्यमातून बनावट बातम्या आणि द्वेष पसरविला. तसेच याचा वापर ते मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करत आहेत. राहुल गांधींनी एका अहवालाचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, 'भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि आरएसएने कब्जा केला आहे.’
राहुल गांधींनी शेअर केलेल्या वृत्तांत, भाजप नेते टी. राजा सिंह यांनी रोहिंग्या मुस्लिमांविषयी केलेल्या विधानाचा उल्लेख केला आहे. या अहवालात फेसबुक कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, भारतात असे बरेच लोक आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवतात. आभासी जगात द्वेषयुक्त पोस्ट टाकल्याने वास्तविक जगात हिंसा आणि तणाव वाढतो.
राहुल गांधी ट्वीट -
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात असे म्हटले आहे की, रोहिंग्या मुस्लिमांना गोळ्या घालायला हव्यात असे भाजप नेते टी. राजा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांनी मुस्लिमांचा उल्लेख 'गद्दार' म्हणून केला आहे आणि मशिदी पाडण्याची धमकीही दिली. याला फेसबुक कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आणि ही पोस्ट कंपनीच्या नियमांविरूद्ध असल्याचे सांगितले. मात्र भारतात कंपनीच्या वरिष्ठ कर्मचार्यांकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही व यामुळे आता फेसबुकच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच बाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. (हेही वाचा: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांजामुळे 100 पक्षी जखमी, बंदी असूनही वापर कायम)
कर्मचार्यांचा असा निष्कर्ष आहे की, 'Dangerous Individuals and Organizations', या धोरणात सिंह यांना फेसबुकवर बंदी घालायला हवी. मात्र, डब्ल्यूएसजेच्या अहवालानुसार, दास यांनी कर्मचार्यांना सांगितले की, मोदींच्या पक्षाच्या (BJP) राजकारण्यांना त्यांच्या नियमनाच्या उल्लंघनाची शिक्षा केल्यास, देशातील कंपनीच्या व्यवसायाचे नुकसान होऊ शकते.