BJP National President JP Nadda यांच्या ताफ्यावर दगडफेक; सारे सुरक्षित असल्याची पश्चिम बंगाल पोलिसांची माहिती
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर आज पश्चिम बंगालमध्ये जात असताना दगडफेक झाली आहे. दरम्यान सध्या स्थिती नियंत्रणात असून सारे जण सुरक्षित आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या पश्चिम बंगालच्या दौर्यावर असलेले भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP national President JP Nadda) यांच्या ताफ्यावर आज (10 डिसेंबर) दगडफेक झाली आहे. जे पी नड्डा यांच्यासोबत भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) देखील होते. त्यांनी या घटनेदरम्यानची हकिकत आणि व्हिडिओ ट्वीटर वर पोस्ट केला आहे. विजयवरर्गीय यांच्या ट्वीट नुसार हा दगडफेकीचा प्रकार सिराकोल बस स्टॅंडजवळ झाला आहे. दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) देखील या घटनेची दखल घेत सदर प्रकरणी तपास सुरू असून भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा सुखरूप असून ते सभास्थळी पोहचले असल्याची माहिती दिली आहे.
ANI च्या ट्वीटनुसार, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या कार्यक्रमस्थळी सुखरूप पोहचले आहेत. त्यांच्या ताफ्याला काहीही झालेले नाही. देबीपूर भागात काहींनी अचानक गाड्यांवर दगडफेक केल्याची माहिती दिली आहे. मात्र आता परिस्थिती शांत आहे. सारे सुरक्षित आहे. नेमकं दगडफेकी मागील कारण काय आहे याचा तपास केला जाईल.
ANI Tweet
कैलाश विजयवर्गीय यांचं ट्वीट
दरम्यान पश्चिम बंगाल मधील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जेपी नड्डा, कैलाश विजयवर्गीय जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. कैलाश यांनी हा प्रकार पोलिसांसमोरच घडल्याचा दावा केला आहे. तर ही दगडफेक टीएमसी कार्यकर्त्यांकडून झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल पोलिसांना नड्डांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती. मात्र ते योग्य बंदोबस्त करण्यासाठी अपुरे पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जेपी नड्डा यांनी कर्यक्रमामध्ये पोहचल्यानंतर आता बंगालमध्ये निश्चितच कमळ फुलणार आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार सत्तेमधून जाईल असा विश्वास बोलताना व्यक्त केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)