BJP Suspends MLA T Raja Singh: भाजप आमदार टी. राजा पक्षातून निलंबित; प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर झाली होती अटक

भारतीय जनता पक्षाचे (BJP) तेलंगनातील (Telangana) आमदार टी राजा (T Raja Singh) यांना पक्षाने निलंबीत (BJP Suspends MLA T Raja Singh) केले आहे. याशिवाय पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत येत्या 10 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. याशिवाय त्यांना पक्षातन हकालपट्टी का करु नये? असा सवालही या नोटीशीच्या माध्यमातून विचारला आहे.

BJP Suspends MLA T Raja Singh: भाजप आमदार टी. राजा पक्षातून निलंबित; प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर झाली होती अटक
T Raja Singh | (Photo Credit - ANI/Twitter)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) तेलंगनातील (Telangana) आमदार टी राजा (T Raja Singh) यांना पक्षाने निलंबीत (BJP Suspends MLA T Raja Singh) केले आहे. याशिवाय पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत येत्या 10 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. याशिवाय त्यांना पक्षातन हकालपट्टी का करु नये? असा सवालही या नोटीशीच्या माध्यमातून विचारला आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मत पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना मंगळवारी (23 ऑगस्ट) सकाळी अटक केली.

टी राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्यांनी प्रेषित महोम्मद पैगंबर यांच्यावर टीप्पणी केली होीत. पैगम्बर मोहम्मद यांच्यावर कथित टप्पणी केल्यानंतर त्यांच्या विरधात अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. इतकेच नव्हे तर, दबीरपुरा, भवानी नगर, रेनबाजार, मीरचौक आदी पोलीस स्टेशनबाहेरही असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. टी राजा यांच्या वक्तव्यानंतर आपल्या भावना तीव्र स्वरुपात व्यक्त करत अनेक नागरिकांनी म्हटले की, त्यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. (हेही वाचा, BJP MLA T Raja Singh Arrested: भाजप नेता टी. राजा यांना अटक; प्रेषित पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण)

दरम्यान, टी.राजा यांनी नुकताच आपला एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्यांनी पैगम्बर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस कमिशनर सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील इतरही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरु झाली. निदर्शन करणारे लोक त्यांच्या मागण्यांवर अडून होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्यांच्या आईबद्दलही टीप्पणी केली होती.

टी. राजा सिंह यांनी हैदराबाद गोशामहल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. या आधी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, आमदार टी राजा सिंह यांनी मुनव्वर फारुकी यांना त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याबाद्दल वक्तव्य केले होते. परिणामी त्यानंतर सुमारे 50 लोक परिसरात पोहोचले होते. मात्र त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक रित्या ताब्यात घेतले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).