भाजप आमदार रवींद्र नाथ त्रिपाठीसह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; महिलेला हॉटेलवर डांबून महिनाभर चालला होता अत्याचार
उत्तर प्रदेशातील भदोही येथील भाजपचे आमदार, रवींद्र नाथ त्रिपाठी (BJP MLA Ravindra Nath Tripathi) यांच्यासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा (Gangrape) गुन्हा दाखल करण्यात आला
उत्तर प्रदेशातील भदोही (Bhadohi) येथील भाजपचे आमदार, रवींद्र नाथ त्रिपाठी (BJP MLA Ravindra Nath Tripathi) यांच्यासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा (Gangrape) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक राम बदन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश यांनी हॉटेलमध्ये महिनाभर या युवतीवर अनेकवेळा सामुहिक बलात्कार केला. 10 फेब्रुवारी रोजी या महिलेने हा आरोप केला होता.
याव्यतिरिक्त, एकदा ती गर्भवती झाली, तेव्हा तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले.
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक रवींद्र वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला. महिलेने दिलेली माहिती आणि हॉटेलसह सर्व मुद्द्यांवर चौकशी केल्यानंतर, आज भाजपा आमदारासह सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर महिलेच्या निवेदनानंतर व वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सिंह म्हणाले. आत्ता सध्या तरी कोणालाही अटक होणार नाही.
आता या संपूर्ण प्रकरणावर रवींद्रनाथ त्रिपाठी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले की, 'टीम या प्रकरणात चौकशी करत आहे. या तपासात मी किंवा माझ्या कुटुंबातील एखादा तरी सदस्य दोषी आढळल्यास मी फाशीसाठी तयार आहे. हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. मी येथे भूमाफियांच्या विरोधात लढा देत आहे, हे त्याच लोकांचे षडयंत्र आहे.' (हेही वाचा: 5 हजाराच्या कर्जासाठी 13 वर्षांच्या मुलीवर 7 जणांचा सामुहिक बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार)
या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी, तिला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. पीडितेचा आरोप आहे की, रविंद्र नाथ यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील काही इतरांनी तिच्यावर हॉटेलमध्ये, जवळपास 1 महिना बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची तिला धमकी देण्यात आली होती.