Patna BJP Workers Protest: बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्याचा पोलिसांचा लाठीमारात मृत्यू
डाकबंगला परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
बिहार विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भाजप नेते (BJP Leader) आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यात जखमी झालेल्या भाजप नेत्याचा मृत्यू झाला. पाटणा येथील डाकबंगला परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात बळाचा वापर केला. लाठिमारात जखमी झालेल्या जहानाबाद नगरचे भाजपचे महामंत्री विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Greater Noida Fire: नोएडामध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावरुन मारल्या उड्या)
[Poll ID="null" title="undefined"]ठलाठिमारात जहानाबाद नगरचे भाजप महामंत्री विजय कुमार सिंह जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी विजय यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर बिहारचं राजकारण तापलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेवरून नितीश कुमार सरकारला घेरलं आहे.
पाहा व्हिडिओ -
तत्पूर्वी, गुरुवारी विधानसभेत या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना मार्शलने उचलले आणि विधानसभेतून बाहेर काढले. त्यानंतर मोर्चा काढलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.