Greater Noida Fire: नोएडामध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

ग्रेटर नोएडातील बिसराख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौर सिटी वन फर्स्ट एव्हेन्यूमधील गॅलेक्सी प्लाझा या मॉलला भीषण आग लागली.

Greater Noida Fire: नोएडामध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावरुन मारल्या उड्या
Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

ग्रेटर नोएडामध्ये एका मॉलला भीषण आग (Greater Noida Mall Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गॅलेक्सी प्लाझामध्ये (Galaxy Plaza) ही भीषण आग लागल्याची घटना घडली. जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. या मॉलमध्ये काही लोक अडकली होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशम दलाचे जवान (Fire Brigade Jawan) घटनास्थळी दाखल झालेत. सध्या आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (हेही वाचा - Pune Accident: कल्याण-भीमाशंकर एसटी बस पुलावरुन ओढ्यात कोसळली, अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी)

ग्रेटर नोएडातील बिसराख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौर सिटी वन फर्स्ट एव्हेन्यूमधील गॅलेक्सी प्लाझा या मॉलला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे कळताच या मॉलमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी काही नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या.

पाहा व्हिडिओ -

आग लागलेल्या गॅलेक्सी प्लाझामध्ये 170 हून अधिक दुकाने आहेत. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अॅनिमेशनचे काम करणाऱ्या स्टुडिओला आग लागली आहे. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. या स्टुडिओच्या आसपास असलेल्या दुकानांचेही नुकसान झाले आहे. स्टुडिओ पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2023 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).