'GST म्हणजे 21 व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा', भाजप नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Subramanian Swamy. (Photo Credits: ANI/File)

वस्तू सेवा कर (Goods and Services Tax) अर्थातच जीएसटी (GST) देशभर लागू करुन आपण फारच मोठी आर्थिक कामगिरी केल्याचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP)  प्रणित एनडीए (NDA) सरकार पीटत असले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते (BJP Leader) आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी 'GST म्हणजे 21 व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा असल्याचे म्हटले आहे.' केंद्र सरकारने जीएसटी म्हणजे टॅक्स रिफॉर्म चे सर्वात मोठे पाऊल असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी आयकर आणि जीएसटी, जो 21 व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा आहे. जीएसटीच्या माध्यमातून लोकांना घाबरवून सोडू नये. स्वामी यांनी म्हटले आहे की, जीएसटी इतका किचकट करुन ठेवला आहे की, तो समजण्यासाठी प्रचंड कठीण आहे. लोकांना कळत नाही की, कोणता फॉर्म कुठे भरायचा आहे आणि कोठे जमा करायचा आहे. आणि ते (सरकार) म्हणतात हा कॉम्पूटरवर अपलोड करा. सुब्रमण्यम स्वामी यांचे विक्तव्य अशा स्थितीत आले आहे ज्या स्थितीत केंद्र सरकार जीएसटी कलेक्शनसाठी झुंज देत आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे म्हटले आहे की, 2030 पर्यंत देश 'महाशक्ती' बनण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची वार्षिक वाढ 10 टक्क्यांपेक्षाही अधिक असणे आवश्यक आहे. जर ही गती कायम राहीली तर, येत्या 50 वर्षांमध्ये आपण चीनलाही पाठीमागे टाकू आणि अमेरिकेच्या प्रथम क्रमांकालाही आव्हान देऊ शकू. भारतासमोर आज सर्वातम मोठी समस्या आहे ती म्हणजे घटत्या मागणीची. लोकांजवळ खर्च करण्यासाठी पैसेच नाहीत ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. (हेही वाचा, Rafale Deal: राफेल डीलमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स करु शकते पुनरागमन, फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीसोबत चर्चा सुरु)

सरकारा अपेक्षीत होते त्याप्रमाणे जीएसटी मिळाला नाही. त्यामुळेच जीएसटी स्लॅबमध्ये वारंवार बदल केला जात आहे. दरम्यान, 1 जुलै 2017 च्या मध्यरात्रीपासून जीएसटी देशभर लागू करण्यात आला. जीएसटी अंतर्गत एकूण 4 स्लॅब करण्यात आले आहेत. जे 12, 18 आणि 28 टक्के असे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या स्लॅबमध्येही बदल केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.