बिहार: चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम झाल्याने लग्न मोडण्यासाठी वराच्या परिवाराला पाठवले अश्लील फोटो, तरुणाची तुरुंगात रवानगी
छपरा (Chhapra) शहरात चुलत बहिणीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका विकृत भावाला अटक करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
छपरा (Chhapra) शहरात चुलत बहिणीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका विकृत भावाला अटक करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सदर तरुण हा बाजार थाना क्षेत्रातील टक्कर मोर स्थित हिमांशु कुमार असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या तरुणाला आपल्या चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम झाले होते. परंतु त्याचे लग्न ठरल्याने त्याला ते मोडण्यासाठी चुलत बहिणीचे अश्लील फोटो त्याने व्हायरल केले. त्याचसोबत तिचे लग्न झालेल्या मुलाच्या परिवाराला ही आरोपीने फोटो शेअर केले. या प्रकारामुळे मुलीचे लग्न मोडले.
असे सांगितले जात आहे की, मुलीचे लग्न सिवान मध्ये ठरले होते. त्यानंतर तिच्या विकृत भावाने तिचे अश्लील फोटोच होणाऱ्या नवऱ्याच्या परिवाराला पाठवले. या कारणामुळे मोठी खळबळ उडाली. तसेच सासरची मंडळी मुलीच्या घरी सुद्धा पोहचली. असा प्रकार कळताच मुलीने नजीकच्या पोलीस स्थानकात धाव घेत प्राथमिक स्वरुपात तक्रार दाखल केली.(Bihar: सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील घटना)
तरुणाला सासरच्या मंडळींनी सुद्धा समजावले. त्यावेळी नातेवाईकांनी ही गोष्ट दाबली पण तरुणाच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. असे सांगितले जात आहे की, मुलीच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला होता. तर आपल्या चुलत भावाच्या या वागण्यामुळे तरुणी आणि आई फार कंटाळली होती. त्याचवेळी मुलीने भावाला सक्त ताकीद ही दिली होती. तरीही सुद्धा त्या मध्ये काहीच बदल झाला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2021 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

