Bihar Shocker: हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोसह 3 वर्षाचा मुलाला जीवंत जाळले, सुपौल जिल्ह्यातील घटना

आशीष कुमार असे आरोपीचे नाव असून रंजन देवी असे पत्नी आणि वैभव असे मुलाचे नाव आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Bihar Shocker: बिहार मधील सुपौल जिल्ह्यात एका गर्भवती महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलाला नवऱ्याने जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आशीष कुमार असे आरोपीचे नाव असून रंजन देवी असे पत्नी आणि वैभव असे मुलाचे नाव आहे. तर रंजन देवी आणि वैभव हे बेडवर बसले असता त्यांना आशीष याने जाळले.(Dog Rape in Ghaziabad: कुत्र्यावर बलात्कार; सासऱ्याच्या कृत्याचा सुनेकडून भांडाफोड, पोलिसांकडून आरोपीला अटक)

आशीष कुमार याच्या घरातून जेव्हा आगीच्या धुराचे लोट बाहेर पडू लागले तेव्हा शेजाऱ्यांना नेमके काय झाले हे आधी कळले नाही. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत पीडितांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला होता. स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, ही घटना दुपारी 2 वाजता घडली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांना बेडवर दोन मृतदेह जळाल्याचे दिसून आले. दोन्ही मृतदेहांसह बेड सुद्धा पूर्णपणे जळला होता असे त्रिवेणीगंजचे एसडीपीओ भगवती ठाकूर यांनी सांगितले.

पीडित महिलेच्या वडिलांनी असे म्हटले की, आशीष हा रंजन देवी हिच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी करत असल्याने त्याच्या विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु त्याला तेवढे पैसे देण्यासाठी नव्हते. त्यामुळे त्याने बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली. आशीष याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या ग्रुप-डी च्या नोकरीसाठी त्याला एका एजेंटला ते पैसे द्यायचे होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Lucknow Shocker: वैवाहिक वादामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन फेकले)

प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आशीष कुमार याची बहिण, आई आणि आणखी एका व्यक्तीचा या गुन्ह्यात समावेश आहे. सध्या त्यांनी पळ काढला आहे. मात्र त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एफएसएल टीमसुद्धा घटनास्थळी पोहचले. रिपोर्ट्समधून घनटेचा अधिक खुलासा होऊ शकतो असे ही त्यांनी म्हटले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif