IPL Auction 2025 Live

Bihar Shocker: पत्नी न सांगताच माहेरी गेल्याचा रागातून व्यक्तीने कापला स्वतःचा Private Part; कुलदेवतेला केला अर्पण

संतोष कुमार यांनी सांगितले की, रुग्ण कृष्णा बासुकीचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला आहे, त्याला डॉक्टरांनी टाके घातले आहेत. आता तो धोक्याबाहेर आहे मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे.

For representational purposes only (Picture Courtesy: Pexels)

बिहारच्या (Bihar) मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी घडलेली एक घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आपल्याला न कळवता तिच्या माहेरच्या घरी गेल्याच्या रागातून चक्क स्वतःचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापला आहे. हा प्रायव्हेट पार्ट त्याने कुलदेवतेला अर्पण केला. या घटनेनंतर नातेवाइकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे प्रकरण मधेपुरा सदर उपविभागातील मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रजनी नयानगर गावातील आहे.

आज तकशी संबंधित मुरारी सिंह यांच्या रिपोर्टनुसार, ही घटना 20 जानेवारीच्या रात्री घडली. कृष्णा बासुकी मंडी, पंजाब येथे राहतो. तिथेच तो काम करतो. दोन महिन्यांपूर्वी तो घरी आला होता. तेव्हापासून तो घरीच राहत होता. कृष्णाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. कैलाश या कुटुंबातील सदस्याने सांगितले की, कृष्णाची पत्नी अनिता कोणालाही न सांगता तिच्या माहेरी गेली होती. खूप वेळ शोधूनही ती सापडली नाही. अखेर ती माहेरी गेल्याची माहिती कृष्णा बासुकी आणि कुटुंबीयांनी समजली.

त्यानंतर कृष्णाने या गोष्टीच्या रागातून धारदार शस्त्राने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्याने हा कापलेला प्रायव्हेट पार्ट स्वतःच्या कुलदैवताच्या ठिकाणी अर्पण केला. कुटुंबीयांनी कुलदेवीच्या ठिकाणी प्रायव्हेट पार्ट पाहिला व दुसरीकडे कृष्णा बासुकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळला. यानंतर त्यांनी घाईघाईने कृष्णा बासुकीला मुरलीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याची गंभीर स्थिती पाहून जननायक कर्पुरी ठाकूर मेडिकल कॉलेज, मधेपुरा येथे रेफर केले. (हेही वाचा: UP Shocker: आईला काकासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, बदनामी होण्याच्या भीतीने 10 वर्षाच्या निष्पाप मुलाचा घेतला जीव)

यासंदर्भात जननायक कर्पूरी ठाकूर मेडिकल कॉलेजच्या डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले की, रुग्ण कृष्णा बासुकीचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला आहे, त्याला डॉक्टरांनी टाके घातले आहेत. आता तो धोक्याबाहेर आहे मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे.