Bihar Shocker: 60 वर्षीय वृद्धाचा भाचीच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय वृद्धाने आपल्याच साडेतीन वर्षीय नातीवर बलात्कार केला आहे. ही घटना 16 डिसेंबरला घडली असून रविवारी जेव्हा अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

Bihar Shocker:  बिहार मध्ये एक धक्कादायक आणि विकृत प्रकाराची घटना उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय वृद्धाने आपल्याच साडेतीन वर्षीय नातीवर बलात्कार केला आहे. ही घटना 16 डिसेंबरला घडली असून रविवारी जेव्हा अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, आरोपी हा हाजिपूर येथे भाचीच्या लग्नासाठी आला होता. त्यावेळी 16 डिसेंबरला रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीवर घराच्या गच्चीवर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टच्या येथे जखमा सुद्धा झाल्या. या प्रकारानंतर मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर सरदार जिल्हा रुग्णालयात हलविले गेले.(Uttar Pradesh: गरम पाण्यावरुन झालेल्या वादावरुन तुटले 16 वर्षांचे नाते, नवऱ्याने बायकोला दिला तिहेरी तलाक)

सरदार रुग्णालयाचे एसडीपीओ राघव दयाल यांनी असे म्हटले की, ही घटना अशा वेळी समोर आली जेव्हा पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतली. परिवारातील मंडळींनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचा खर्च करतो असे ही म्हटले. परंतु घटनेच्या दोन दिवसांनी मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.(Jaipur: अचनाक घरी आला प्रेयसीचा पति, पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याने प्रियकराने गमावला जीव)

महिला पोलिस स्टेशनच्या एसएचओ पुष्पा कुमारी यांनी असे म्हटले की, मुलीच्या आईने कपड्यावरील रक्ताचे डाग, उशी आणि चादर हे धुतले जेणेकरुन घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला कळू नये. त्यामुळे आम्हाला घटनास्थळावरुन कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पुष्पा कुमारी यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.