बिहार: मणिपूर येथे तरुणीसोबत मस्ती-मजा करतानाचा आमदरांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रवक्त्याने मागितला रिपोर्ट
तसेच आमदारांसोबत गेलेल्या विधासभेच्या सचिवालय अधिकाऱ्यांकडून याबद्दल रिपोर्ट मागितला आहे.
बिहार (Bihar) मधील चार आमदरांचा कथित विवादीत व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी (Vijay Kumar Chaudhary) यांनी दखल घेतली आहे. तसेच आमदारांसोबत गेलेल्या विधासभेच्या सचिवालय अधिकाऱ्यांकडून याबद्दल रिपोर्ट मागितला आहे. प्रभात यांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्याजवळ जी बातमी आली आहे ती मीडियाच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे याबद्दल आता विधानसभेच्या अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागितला आहे. तर स्टडी टूरसाठी (Study Tour) जे कोणी गेले होते त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवली जात आहे. रिपोर्ट मध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीनुसार कारवाई केली जाणार आहे. तर इम्फाल टाइम्स यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे असा दावा करण्यात आला होता की, मणिपुर येथे स्टडी टूरसाठी बिहारमधील चार आमदार भारत-म्यानमार सीमेवर (India-Myanmar Border) असणाऱ्या मोरेह शहरात तरुणीसोबत मजा-मस्ती करत होते.
इम्फाल टाइम्स (Imphal Times) यांच्याकडून असे सांगण्यात आले होते की, या व्हिडिओतील नेता आमदार यदुवंश कुमार यादव, आमदार सचिन प्रसाद सिंह, आमदार राज कुमार राय आणि आमदार शिवचंद्रम राम आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओला आरजेडीचे आमदार यदुवंश यादव यांनी तो खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्या व्हिडिओत मी नसल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत आमदार शिवचंद्र राम यांचे असे म्हणणे आहे की, व्हायरल झालेल्या व्हिडिओसोबत माझा कोणताही संबंध नाही. (मणिपूर येथे स्टडी टूरसाठी गेलेल्या बिहारच्या आमदारांचा तरुणीसोबतचा आक्षेपार्ह डान्स सोशल मीडियात व्हायरल Video)
पाहा व्हिडिओ:
दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हायरल झालेला व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. बिहार विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनी याबद्दल रिपोर्ट मागीतला आहे. तसेच या प्रकरणी सविस्तर तपासणी केल्यानंतर खरे सत्य समोर येईल.