Bihar: मुलं सतत रडतं म्हणून आईचा अजब प्रकार, बाळाच्या ओठांना फेविक्विक लावून चिटकवले ओठ

तसेच प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलावर प्रेम करतात. त्यांना कधीही दु:ख होऊ नये म्हणून नेहमीच त्यांच्यासाठी धडपड करताना दिसून येतात. मात्र अशातच एक धक्कादायक प्रकार बिहार येथून समोर आला आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: Pexels)

Bihar: लहान मुल हे देवाघरची फुल असतात असे नेहमीच म्हटले जाते. तसेच प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलावर प्रेम करतात. त्यांना कधीही दु:ख होऊ नये म्हणून नेहमीच त्यांच्यासाठी धडपड करताना दिसून येतात. मात्र अशातच एक धक्कादायक प्रकार बिहार येथून समोर आला आहे. त्यानुसार एका महिलेने असा प्रकार केला आहे की, कोणाचा त्यावर विश्वासच बसणार नाही. छपरा मध्ये राहणाऱ्या महिलेने आपले लहान मुल सतत रडते म्हणून त्याला वैतागून तिचे तोंडच चिटकवले आहे.

ही घटना जशी समोर आली तेव्हा खळबळ उडाली आङे. कोणालाच विश्वास बसत नाही आहे की, अशी कोणती आई असेल जी या प्रकारचे कृत्य करु शकते. आपल्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून वैतागल्याने तिने अखेर तोंडच फेविक्विकने चिटकवले आहे. कारण तो आवाज करुन रडणार नाही. जेव्हा नवऱ्याची नजर मुलावर पडली तेव्हा त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.(Meerut: बायकोचा माहेरहून परतण्यास नकार, संतप्त नवऱ्याकडून पोटच्या दोन अल्पवयीन मुलीची हत्या)

या प्रकरणी जेव्हा महिलेसोबत बातचीत केली तेव्हा तिने असे म्हटले की, मुलाला ती कंटाळली होती. दूध पाजणे आणि जेवल्यानंतर सुद्धा मुल वारंवार रडत होते. नवरा सकाळच्या वेळेस ऑफिसला निघून जायचा. त्यामुळे घरात एकटी असल्याने घरची काम आणि मुलाला सुद्धा सांभाळावे लागत असे. मात्र जेव्हा मुल सतत रडत असल्याने ते सहन व्हायचे नाही. खुप वेळा मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काही झाले नाही. अखेर फेविक्विकने तोंडच मुलाचे चिपकवल्याचे महिलेने सांगितले.

नवरा घरी परतल्यानंतर त्याला आपल्या मुलाचा आवाज ऐकून न आल्याने तो कावराबावरा झाला. पण जेव्हा मुलाला त्याने पाहिले तेव्हा तो शांत झाला. परंतु मुलाचे ओठ एकमेकांना चिकटल्याचे त्याला दिसले. महिलेने नवऱ्याला आधी खोट सांगितले की, मुलाने तोंडाला गम लावला. मात्र नवऱ्याने कसून तिला विचारले असता तिने खरे सांगितले.

नवऱ्याने तातडीने मुलाला रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा तो प्रकार पाहून चक्रावले. ज्या लोकांना कळले की, यामागे त्याच्याच आईचा हात आहे तर कोणाला विश्वासच बसत नव्हता. डॉक्टरांनी मुलावर उपचार करत एकमेकांना चिकटलेले ओठ पुर्ववत केले. आता मुलाची प्रकृती स्थिर आहे.