Bihar: मॉलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एका महिलेसह आरोपीला अटक

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवुन पीडितेला घरी बोलावले.

Representational Image (Photo Credits: ANI)

बिहार मधील बेगूसराय मध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवुन पीडितेला घरी बोलावले. त्यानंतर तिला बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी एका तरुणासह मॉलमध्ये काम करणाऱ्या महिलेला सुद्धा अटक करण्यात आली आहे.(Bihar: नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, मुलीची हत्या केल्यानंतर बायकोचा आत्महत्येचा प्रयत्न)

मॉलमध्ये साफसफाई करणाऱ्या एका महिलेने अल्पवयीन मुलीला बोलावले होते. तिने तिला काम मिळवून देते असे सांगितले. परंतु गुरुवारी रात्री आरोपी महिला पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन एका घरात आली. तेथे पीडितेला महिलेने घरातच बंद केले. मॉलचा अधिकारी असल्याचे भासवत अटल कुमार नावाचा व्यक्ती तेथे पोहचला. त्यानेच पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.(Bihar: धक्कादायक! कणीस भाजताना झोपडीला लागली आग; 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू)

पीडिताने शुक्रवारी सकाळी त्या घरातून आपला जीव वाचवत तेथून पळाली. तातडीने तिने आपल्या नातेवाईकांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पीडितेसोबत झालेली घटना ऐकल्यानंतर नातेवाईकांच्या पायाखालील जमिन सरकली. त्यानंतर पीडितेसह नातेवाईकांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेची वैद्यकिय चाचणी सुद्धा नजीकच्या रुग्णालयात करण्यात आली.