धक्कादायक! बिहार मध्ये जानेवारी- सप्टेंबर महिन्यापर्यंत दर दिवसाला 4 रेप किंवा सामूहिक बलात्काराचे गुन्हे दाखल
यंदाच्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान बिहार (Bihar) मध्ये प्रत्येक दिवसाला दुष्कर्म किंवा सामूहिक बलात्काराच्या 4 प्रकरणांबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान बिहार (Bihar) मध्ये प्रत्येक दिवसाला दुष्कर्म किंवा सामूहिक बलात्काराच्या 4 प्रकरणांबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस विभागातील सुत्रांनी असे म्हटले आहे की, पोलीस स्थानकात अशा पद्धतीचे एकूण 1106 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. IANS यांना प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जून मध्ये सर्वाधिक 152 प्रकरणे, जुलै मध्ये 149, ऑगस्टमध्ये 139 प्रकरणे दाखल झाली आहेत. या पूर्वी जानेवारी मध्ये 88, फेब्रुवारी मध्ये 105, मार्च 129, एप्रिल 82, मे महिन्यात 120 आणि सप्टेंबर महिन्यात 142 प्रकरणे दाखल केली गेली आहेत.
दुष्कर्म आणि सामूहिक दुष्कर्मच्या घटनांव्यतिरिक्त बिहारच्या विविध पोलीस स्थानकात छेडछाड आणि शोषणासह ब्लॅकमेलिंगचे सुद्धा प्रतिदिनी 6-7 प्रकरणे दाखल केले जातात. पटनाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, दुष्कर्म आणि सामूहिक दुष्कर्माच्या गुन्हांसह एक सामाजिक मुद्दा ही आहे. यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील एसीपी यांना निर्देशन देण्यात आले आहे की, अपराधाबद्दल तरुणांना शिक्षण देण्यासाठी विशेष रुपात ग्रामिण भागात सामाजिक अभियान सुरु करावे.(Hamirpur Rape: धक्कादायक! अल्पवयीन चुलत्याकडून 5 वर्षीय पुतणीवर बलात्कार; उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथील घटना)
अधिकृत माहितीनुसार, पोलीस कंट्रोल रुममध्ये जवळजवळ 1800 ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, बिहारचे कटू सत्य असे आहे की, 90 टक्के तक्रारींबद्दल FIR दाखल केला जात नाही. तर वुमन हेल्पलाइन प्रोजेक्ट मॅनेजर प्रमिला कुमारी यांनी असे म्हटले की, पोलीस तपासादरम्यान पीडित लोक एफआयआर दाखल करण्यासह सामाजिक मुद्द्यांमुळे पुढे येण्यास घाबरतात. त्याचसोबत दुष्कर्मांमधील बहुतांश प्रकरणात आरोपी एखादा परिचयाचा व्यक्ती किंवा नातेवाईक असतो. त्यानंतर आम्ही प्रत्येक पीडित व्यक्तीचे काउंसिलिंग करतो. मात्र हे पीडितावर निर्भर आहे की, हे प्रकरण पुढे वाढवले जाईल की नाही.
दरम्यान, नुकत्याच 15 डिसेंबरला भोजपुर जिल्ह्यातील पीरो गावात एका दलित मुलीस तरुणांनी दुष्कर्म केले. तिच्या नातेवाईकांना ही मारले गेले. त्यांना जातीवरुन ही अपशब्द वापरले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी पीडितेची वैद्यकिय चाचणी करण्यास उशिर केला. 9 डिसेंबरला बांका जिल्ह्यात 16 वर्षीय मुलीचे अपहरण करत तिच्यासोबत सामूहिक दुष्कर्म करण्यात आले. 19 ऑक्टोंबरला बिहार मध्ये किशनगंज जिल्ह्यात 19 वर्षीय मुलीस सुद्धा 3 लोकांनी सामूहिक दुष्कर्म केले.(Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींवर CBI कडून चार्जशीट दाखल, 4 जानेवारीला होणार सुनावणी)
बांका मधील एसपी अरविंद गुप्ता यांनी असे म्हटले की, आम्ही महिलांच्या विरोधातील अपराधांच्या प्रकरणी पोलिसांना हाय अलर्टवर ठेवले आहे. आम्ही पोलिसांना लवकरात लवकर एफआयआर दाखल करणे आणि पीडितेची पूर्णपणे सहाय्यता करण्याचे निर्देशन दिले आहेत. 16 वर्षीय मुलीसह सामूहिक दुष्कर्माच्या प्रकरणी आम्ही तातडीने एक टीम तयार केली आहे. आरोपींना विविध ठिकाणी छापेमारी करत ताब्यात घेण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)