Hamirpur Rape: धक्कादायक! अल्पवयीन चुलत्याकडून 5 वर्षीय पुतणीवर बलात्कार; उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथील घटना

ही घटना शनिवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे.

Hamirpur Rape: धक्कादायक! अल्पवयीन चुलत्याकडून 5 वर्षीय पुतणीवर बलात्कार; उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथील घटना
Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोतवाली परिसरात एका अल्पवयीन मुलाने त्याच्या 5 वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडिताला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली जाणार आहे, असे हमीरपुरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र कुमार सिंह म्हणाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी दुपारी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी पीडिताच्या काकाने तिला बिस्किट देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी रडत-रडत आपल्या घरी आली. तसेच तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार तिने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आईने तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींवर CBI कडून चार्जशीट दाखल, 4 जानेवारीला होणार सुनावणी

नरेंद्र कुमार सिंह म्हणाले की, आरोपीने बिस्किट देण्याचे बहाण्याने पीडिताला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडिताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधयेक कलम 376, 342 आणि पोक्सो अधिनियम कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल अल्यानंतर पुढील कारवाईला तपास केला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2020 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).