Bihar Assembly Elections 2020: अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित? बिहार निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाच्या फायद्याची?

दरम्यान, आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एमआयएम सोबत बिहारमध्ये एण्ट्री घेतल्यास बिहारमधील सत्तासमिकरण खरोखरच बदलू शकते काय? या नव्या सत्तासमिकरणाचा बिहारमध्ये कोणाला होई शकतो फायदा?

Prakash Ambedkar | (Photo Credits: Facebook)

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम (MIAM) आघाडी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात मतांचा टक्का मोठ्या प्रमाणावर मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. या दोन्ही पक्षांची ही आघाडी पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये दिसली नाही. परंतू, बिहार विधानभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Elections 2020) हे समिकरण पुन्हा दिसणार आहे. व्हीबीएचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतीच तशी घोषणा केली. सोबतच वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि एमआयएम एकत्र आल्यास बिहारमधील सत्तासमिकरण बदलू शकते असा दावा आकडेवारी देऊन केला आहे. बिहारमधील एनडीए सरकार पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एमआयएम सोबत बिहारमध्ये एण्ट्री घेतल्यास बिहारमधील सत्तासमिकरण खरोखरच बदलू शकते काय? अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित? या नव्या सत्तासमिकरणाचा बिहारमध्ये कोणाला होई शकतो फायदा?

काय म्हणाले आंबेडकर?

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी देशात नव्या राजकारणाची सुरुवात करते आहे.. महाराष्ट्रात त्याची सुरवात झाली. एमआयएमसोबत आम्ही (VBH) लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आघाडी केला. त्याचा परिणाम असा झाला की, एमआएमची एक जागा विजयी झाली. या यशाची सर्वत्र चर्चा झाली. आपेक्षा होती की विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सुद्धा ही आघाडी कायम राहील. परंतू, तसे घडले नाही. एमआयएमने विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये 100 जागांची मागणी केली. आपण जाणू शकता कोणत्याही एका समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा दिल्या जाऊ शकत नाही. परंतू हरकत नाही. जे महाराष्ट्रात चित्र दिसले नाही ते बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये दिसू शकते.

40% मतांच्या जोरावर सहज पराभव

अँड. आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही बिहार विधानसभा निवडणूक भाग घेऊ इच्छितो. बिहार विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याचे प्रमुख ध्येय आहे एनडीए सरकारला पराभूत करणे. 16 ते 17 टक्के मुसलमान आहेत. 18 ते 19 टक्के आंबेडकरवादी आहेत. दोन्हीची संख्या विचारात घेतली तर ती 40 टक्के इतकी होते. 40 टक्के मतांच्या जोरावर आपण कोणत्याही सरकारला पराभूत करु शकतो. त्यामुळे आंबेडकरवादी, मुस्लिम, आदिवासी या शक्ती एकत्र आल्या तर एनडीए सरकारला नक्की पराभूत करु शकतो. हा सर्व समाज यावार विचार करेल असा विश्वास आहे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन)

विधानसभा निवडणूक 2015 निकाल (पक्षनिहाय)

रालोआ (NDA)

महागठबंधन

बिहार विधानसभा निवडणूक 2015 निकाल मतदान टक्केवारी

बिहार विधानसभा निवडणूक 2015 मध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), संयुक्त जनता दल (जदयु) आणि काँग्रेस पक्ष अशी आघाडी असलेली महागठबंधन विजयी झाली. या विजयाच्या मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली तर महागठबंधनला 43% मते मिळाली. यात राजद (RJD) 18.4%, जदयू (JDU) 16.8% आणि काँग्रेस 6.7% मते मिळाली. दुसऱ्या बाजूला एनडीएला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता एनडीएला एकूण 33% मते मिळाली. त्यपैकी भाजप (BJP) 24.4% लोजपा (LJP) 4.8%, उपेंद्र कुशवाहा यांच्या रालोसपा (RLSP) 2.4% आणि जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) पक्षास 2.2% मते मिळाली.

आंबेडकरांच्या बिहार एण्ट्रीचा फायदा कुणाला?

विधनसभा निवडणूक 2015 मध्ये बिहारमध्ये सर्वसाधारणपणे 76% एकूण मतदान झाले असे आकडेवारी सांगते. त्यातही महागठबंधन 43% आणि एनडीए 33% मते घेताना दिसले. म्हणजेच दोघांमध्ये अवघ्या 10% मतांचा फरक जाणवतो. आता अॅड. आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानुसार आंबेडकरवादी आणि मुस्लिम मतांची संख्या जवळपास 40% इतकी आहे. त्यामुळे अॅड. आंबेडकर यांचा दावा 100% जरी वास्तवात उतरला नाही आणि किमा 10 ते 15% मतदारांनी जरी आंबेडकरांना पाठिंबा दर्शवला तरी बिहारच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजू शकते. कारण 2015 मधील आकडेवारी पाहात एनडीए आणि महागठबंधन यांच्यात केवळ 10 टक्के मतांचाच फरक आहे. हा फरक आंबेडकर स्वत:कडे खेचू शकले तर व्हीबीएच आणि एमआयएम सत्तेत आले नाही तरी कोणाला सत्तेत आणायचे आणि दूर ठेवायचे हे नक्कीच ठरवू शकतात.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी (संपुआ-UPA) आघाडीची मते कापण्यात वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली होती. त्यामुळे यूपीएच्या अनेक उमेदवारांचा अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. ज्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. काहींनी तर थेट आरोप केला की वंचीत बहुजन आघाडी ही भाजपची 'टीम बी' आहे. वास्तवातही वंचितमुळे भाजपला मोठा फायदा झाला. तर यूपीएच्या जागा कमी होण्यास मोठी मदत झाली. आता बिहारमध्ये अॅड. आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वत: किती फायद्यात राहते आणि एनडीए, महागठबंधन यांपैकी कुणाला तारक अथवा मारक ठकरे याबाबत उत्सुकता आहे.