IPL Auction 2025 Live

Bihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन

त्यामुळेच आम्ही आघाडीचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी बिहारध्ये एनडीए- जदयु- भाजप सरकारचा पराभव झाला तर भविष्यातले राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकते याचे काही संकेतच अॅड. आंबेडकर यांनी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Prakash Ambedkar (Photo Credits-ANI)

केंद्रात सत्तेत असलेले भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA) सरकार पाडता येऊ शकतं, असा विश्वास वंचित बहूजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar,Bihar Assembly Election 2020) आम्ही देशाच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. बिहार विधानसभा निवडणुकीत जर एनडीए सरकारचा (जदयु-भाजप) पराभव करता आला तर आम्ही असे मानतो की केंद्रातील विद्यमान सरकारही पाडता येऊ शकते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, देशाच्या भवितव्यासाठी बिहार विधानसभा निवडणूक 2020 किती महत्त्वाची आहे हे आम्ही चांगलेच जाणतो. त्यामुळेच आम्ही आघाडीचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी बिहारध्ये विद्यमान सरकारचा (एनडीए- जदयु- भाजप) पराभव झाला तर भविष्यातले राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकते याचे काही संकेतच अॅड. आंबेडकर यांनी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

प्रकाश आंबेडकर ट्वीट -

बिहारमध्ये 2015 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. ही निवडणूक लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या दोन पक्षांनी एकत्र लढवली. तर काँग्रेस आणि भाजप यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढवली. परिणामी जद आणि जदयु या दोन पक्षांना जनाधार मिळाला. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहारच्या राजकारणात 'पॉस्टर वॉर', नितीश कुमार यांच्या DNA मध्ये गडबड, लालू प्रसाद यादव यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा)

निवडणूकपूर्व आघाडी असल्यामुळे हे दोन्ही पक्ष (जद, जदयु) सत्तेवर आले. परंतू, या दोन्ही पक्षांचा संसार फार काळ चालला नाही. अवघ्या 6 महिन्यांमध्ये या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हे सरकार पडले. त्यानंतर काही दिवसांमध्येच नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करत पुन्हा नवे सरकार स्थापन केले. गेल्या साडेचार वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड आणि भाजपचे सरकार सत्तेवर आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील सरकारचीही लिटमस टेस्ट होणार आहे. करण निवडणूकपूर्व आघाडी मोडून बिहारमध्ये विरोधी पक्षासोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न नितीश कुमार यांनी केला. थोड्याफार किंवा बऱ्याच फरकाने महाराष्ट्रातही हा प्रयत्न झाला. त्यामुळे अशा प्रकारची युती केल्यावर जनमतावर त्याचा काय परिणाम होतो हे कळणार आहे. तसेच, केंद्र सरकार सध्या जी धोरणे राबवत आहे ती जनमानसाला रुचतात किंवा नाही याचाही भांडाफोड बिहार विधानसभा निवडणुकीत होणार आहे.