Bihar Assembly Election 2020: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक यांचा समावेश

अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि फौजिया खान हे इतर स्टार प्रचारक आहेत.

NCP Chief Sharad Pawar | (Photo Credits: Faceboo

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ( Bihar Assembly Election 2020) आपल्या स्टार प्रचारकांची यादी (NCP Star Campaigners) जाहीर केली आहे. या यादीत 40 जणांचा समावेश आहे. पक्षाने नुकीतच याबाबत माहिती दिली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे प्रमुख स्टार प्रचारक असतील असेही पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तेत असलेली शिवसेनाही बिहारमध्ये निवडणूक लढवत आहे. शिवसनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि फौजिया खान हे इतर स्टार प्रचारक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये एकूण किती जागा लढवणार आहे, याबाबत मात्र नेमका आकडा समजू शकला नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुजरात, उत्तर प्रदेश यांसह इतरही अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेननेही आपले स्टार प्रचारक जाहीर केले आहेत या, मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: शिवसेना सज्ज! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 तीन टप्प्यात पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या 28 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. दुसरा टप्पा 3 आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. सर्व टप्प्यांची मिळून एकत्र मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.