Bhopal Shocker: 'आत्मे मला त्रास देत आहेत, म्हणून मी माझे शरीर सोडत आहे'; सुसाईड नोट लिहून 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या, भोपाळमधील धक्कादायक घटना
माहितीनुसार, तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, अनेकांनी माझा छळ केला आहे. येथे सात आत्मे आहेत, जे मला सतत त्रास देत आहे. म्हणूनच मी माझे शरीर सोडत आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय तरुणाने चक्क आत्म्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून ही बाब समोर आली आहे. या व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 7 आत्मे त्याला त्रास देत होते, त्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे कुटुंबीयांची दुरवस्था झाली आहे. मृत हा मूळचा बैतूल गावचा रहिवासी होता.
अहवालानुसार, 22 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह शहरातील बजारिया भागात भाड्याच्या खोलीत सापडला होता. या व्यक्तीने गळफास लावून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताच्या खोलीत जाऊन मृतदेह खाली घेतला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या लोकांची चौकशी केली. (हेही वाचा: Martha Chapel Cemetery: टेक्सासच्या शापित अशा ‘मार्था चॅपल कब्रस्तान’मध्ये मुलीचे भूत? Google Maps Street View मध्ये दिसली रहस्यमय आकृती)
तरुणाचे नाव तरुण शर्मा असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. तो इंदूरमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. कामासंदर्भात त्याला भोपाळहून अनेक ठिकाणी फिरावे लागायचे. मृताला एकच बहीण होती. पोलिसांनी या मृत बहिणीला घटनेची माहिती देऊन तिला भोपाळला बोलावले. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह बहिणीच्या ताब्यात दिला. महिलेने भोपाळमध्येच भावाचे अंत्यसंस्कार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, अनेकांनी माझा छळ केला आहे. येथे सात आत्मे आहेत, जे मला सतत त्रास देत आहे. म्हणूनच मी माझे शरीर सोडत आहे. आता पुढच्या जन्मी मी माझे मूळ शरीर धारण करीन. मला या आत्म्यांपासून मुक्ती हवी आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2024 09:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

