सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित विरुद्ध उद्या भीम आर्मी कडून भारत बंदची हाक: चंद्रशेखर आझाद

भीम आर्मीच्या (Bhim Army) चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी आरक्षण (Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाचा विरोध करण्यासाठी उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत बंद (Bharat Bandh) ची हाक दिली आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

भीम आर्मीच्या (Bhim Army) चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी आरक्षण (Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाचा विरोध करण्यासाठी उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत बंद (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. राज्य सरकारी नोकरीत जातीय आरक्षण देणे तसेच नोकरीमध्ये बढतीच्या वेळी आरक्षणाचे फायदे देणे रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यांनतर आझाद यांच्याकडून देशव्यापी बंदाची हाक देण्यात आली आहे. या बंदसाठी काही सामाजिक आणि राजकीय संस्थानी पाठिंबा दिला आहे. या बंद ची घोषणा करताना आझाद यांनी न्यायालयाचा हा निर्णय केवळ हिंदू केंद्रित राज्याची बांधणी करण्याच्या हेतूने पुरस्कृत आहे आणि हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही, भाजप आणि आरेसेसला आम्ही हे दाखवून देऊच आणि आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत साकारू असे म्हणत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने " एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीच्या वेळी पदोन्नतींमध्ये आरक्षणाचा दावा करता येणार नाही". असा निर्णय दिला होता. कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकार आरक्षण देण्यास बांधील नाही हे ही स्पष्ट झाले होते. मात्र अशा प्रकार कोर्ट राज्यांना आरक्षण संदर्भात निर्देश देऊ शकत नाही असे म्हणत आझाद यांनी संप पुकारला आहे.

दरम्यान,अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात आलेल्या संरक्षणात्मक आरक्षणाचा हा अंत करण्याचा प्रयत्न आहे असेही आझाद यांनी म्हंटले आहे, तसेच बंद पुकारून या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आझाद यांच्या या बंद साठी बिहार मधून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी, उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपी, जीतन राम मांझीचा हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif