BHEL मध्ये 330 जागांवर इंटरनशीपची संधी, दहावी पास उमेदवार करु शकतात अर्ज
कारण केंद्र सरकारच्या BHEL या कंपनीत इंटरनशीपसाठी भरती करण्यात येणार आहे. परंतु इंटरनशीप ही भोपाळ येथे असणार असून त्या संदर्भात नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
जर तुम्ही एखाद्या नोकरी किंवा इंटरनशीपच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या BHEL या कंपनीत इंटरनशीपसाठी भरती करण्यात येणार आहे. परंतु इंटरनशीप ही भोपाळ येथे असणार असून त्या संदर्भात नोटीस सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. या इंटरनशीपसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.(BARC Recruitment 2021: नर्स ते ड्रायव्हर बीएआरसी मध्ये 63 जागी नोकरभरतीसाठी barc.gov.in वर करा 15 फेब्रुवारी पूर्वी अर्ज)
उमेदवारांना इंटरनशीप संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास bplcareers.bhel.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारी पासूनच सुरु झाली आहे. पण उमेदवारांनी लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी दिली गेली आहे. या इंटरनशीपसाठी 10 वी पास उमेदवार सुद्धा सहभागी होऊ शकतात. वयाची अट ही 14 ते 27 वर्ष ठेवली असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सूट दिली जाणार आहे.
दरम्यान, उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या गुणांवरुन केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रत सेव्ह करावी अशी सुचना सुद्धा उमेदवारांना दिली गेली आहे.(PWD Engineer Recruitment: 'या' पद्धतीने केली जाते पीडब्ल्यूडी अभियंता भरती; पात्रता, वेतन आणि निवड प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घ्या)
तसेच वेस्ट सेंट्रल रेल्वेकडून ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती करण्यासंबंधित नोटीस जाहीर केली आहे. वेस्ट सेंन्ट्रल रेल्वेत या नोकर भरती अंतर्गत इलेक्ट्रिशन, वेल्डर, फिटलर. वायरमॅन, कारपेंटर, पेंटर, गार्डनर, स्टेनोग्राफरसह एकूण 561 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्जाची अंतिम तारखी 27 फेब्रुवारी 2021 आहे. रेल्वेत ट्रेड अप्रेंटिसच्या या पदांवर 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात ITI असणे अनिवार्य सुद्धा आहे. तर उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्ष आणि अधिकाधिक वय 24 वर्ष असावे. तर आरक्षित वर्गासाठी नियमानुसार सूट दिली जाणार आहे.