Viral Video: ट्रेनमध्ये प्रवास करताना लोक अनेकदा खाद्यपदार्थ खरेदी करतात. ती गोष्ट कशी तयार झाली आहे याचा विचारही न करता ते आनंदाने खातात. ट्रेनमध्ये प्रवास करताना हे खाद्य पदार्थ चांगले वाटत असले तरी पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये मसालेदार भेळ खाणे बंद कराल. ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक चटपटीत भेळ विकत घेतात आणि मग ते आनंदाने खातात. या व्हिडिओमध्ये असे काही आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये भेळ खाणे बंद कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, ट्रेनमध्ये भेळ विकणारा व्यक्ती ट्रेनच्या टॉयलेटजवळ बसून कांदा कापत आहे, जिथे शेकडो लोक नेहमी येतात आणि जातात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला किळस वाटू लागेल. @Tiwari__Saab नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ:
ट्रेन के सफर में गलती से भी चने मत खायेगा
देखिए कैसे तैयार किया जाता है 😡 pic.twitter.com/yOC9AO9QDZ
— 𝗠𝗮𝗻𝗶𝘀𝗵 𝗗𝗮𝘁𝘁 𝗧𝗶𝘄𝗮𝗿𝗶 (@Tiwari__Saab) October 21, 2024
एकाने लिहिले की, किळसवाणे, दुसऱ्याने लिहिले की, 'खरंच, ट्रेनमधून प्रवास करताना भेट सावधगिरीने खावेत, कधी कधी हरभरा स्वच्छतेचा अभाव असतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, सुरक्षित रहा.... ट्रेनमध्ये अस्वच्छ आणि असुरक्षित पद्धतीने खाद्यपदार्थ तयार करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नात किडे सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता लोक त्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.