Bharat Bandh: भारत बंदला बँक कर्मचाऱ्यांचे समर्थन, सरकारचा निषेध करण्यासाठी विविध युनियन एकत्रित येणार

Farmers' protest in Delhi | (Photo Credits: PTI)

Bharat Bandh: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून गेल्या 11 दिवसांपासून जोरदार आंदोलन केले जात आहे. तर उद्या म्हणजेच 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदच्या हाकेला विविध पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभुमीवर भारत बंदच्या हाकेत बँक कर्मचाऱ्यांनी ही आपले समर्थन दिले आहे. त्यामुळे बँकिंग सेवेवर याचा परिणाम होणार असून नागरिकांनी त्यांची बँक संबंधित कामे करणे अश्यक होणार आहे.(Bharat Bandh: भारत बंद संबंधित केंद्र सरकारकडून Advisory जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

भारत बंदच्या हाकेत ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईड फेडरेशन यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बँकेचे कर्मचारी यामध्ये सहभागी होण्यासाठी बिल्ले लावून सरकारचा निषेध करणार आहे. त्याचसोबत केंद्र सरकारच्या फार्म बिलाच्या विरोधात मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.(Farmers Protest: शिवसेना, शरद पवार, समाजवादी पक्ष यांचे वागणे दुटप्पी- रविशंकर प्रसाद)

देशभरातील शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे केंद्र सरकारला सातत्याने सांगत आहे. त्यामुळे जर या मागण्यांवर लवकरच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा ही आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंघु बॉर्डवर अभिनेता दिलजित दोसांज याने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तो आंदोलनात सहभागी झाला होता. तर काल राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारचा मानकरी बॉक्सर विजेंदर सिंह याने शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्याने असे म्हटले की, जर सरकारने त्यांचा हा काळा कायदा मागे न घेतल्यास माझा खेलरत्न परत करणार आहे. शेतकऱ्यांच्या फार्म बिलाच्या विरोधातील आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिदास दिला जात आहे.