Bengaluru Teacher Affair With Student's Father: विद्यार्थ्याच्या वडिलांशी प्रेमसंबंध, बंगळुरु येथील महिला शिक्षकास अटक; काय आहे प्रकरण?
Karnataka News: बंगळुरूच्या एका महिला शिक्षकास आणि तिच्या साथीदारांना विद्यार्थ्याच्या वडिलांकडून 20 लाख रुपये ब्लॅकमेल करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींनी खाजगी फोटो आणि व्हिडिओ वापरून पैसे मागितले, ज्यामुळे त्यांना केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली.
केंद्रीय गुन्हे शाखेने (Central Crime Branch) बंगळुरु येथील (Bengaluru Crime) 25 वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी आणि तिच्या दोन साथीदारांना - गणेश काळे (38) आणि सागर (28) - यांना ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या (Extortion Case) आरोपाखाली अटक () केली आहे. या तिघांनी एका विद्यार्थ्याच्या वडिलांकडून 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे, नंतर खाजगी फोटो आणि व्हिडिओ जाहीर करण्याची धमकी देऊन अतिरिक्त 20 लाख रुपये मागितले. सीसीबीच्या प्राथमिक तपासानुसार, सदर शिक्षिकेचे विद्यार्थ्याच्या विडिलांसोबत प्रेमसंबंध होते. ज्याचा वापर ती त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असे.
प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि खंडणी
महिला शिक्षक अटक प्रकरणात पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती (विद्यार्थ्याचे वडील) पश्चिम बेंगळुरूमध्ये त्याची पत्नी आणि तीन अपत्यांसह राहतो. त्याचा सर्वात लहान मुलगा, पाच वर्षांचा आहे. जो 2023 मध्ये आरोपी महिला शिक्षकाच्या शाळेत दाखल झाला होता. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याचे वडील आणि महिला शिक्षक श्रीदेवी रुदागी यांची भेट झाली. त्यांचा संवाद हळूहळू वाढला आणि वैयक्तिक झाला. दोघांनी वेगवेगळे सिम कार्ड आणि फोन वापरून मेसेज आणि व्हिडिओ कॉलची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांच्यात आणखीच जवळीक आलि आणि त्यांच्या खासगी भेटी झाल्या. (हेही वाचा, Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण)
दरम्यान, हे प्रेमसंबंध सुरु असतानाच अचानक श्रीदेवी रुदागी हिने विद्यार्थ्याच्या वडिलांकडे 4 लाख रुपयांची मागणी केली. पीडिताने पूर्ण केली. शिक्षकाचे इतक्यावरच समाधान झाले नाही. तिने जानेवारी 2025 मध्ये आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. ज्यामुळे पीडिावर दडपण आले. हे पैसे देण्यास तो असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. ज्यामुळे शिक्षकाने त्याच्यावरचा दबाव वाढवत त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे पीडित आणखीच हादरुन गेला. (हेही वाचा, Vasai Student Molestation: चुकीचा स्पर्श, जबरदस्ती चुंबन, वसई येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकास ग्रामस्थांचा चोप; पोलिसांकडून अटक)
धमक्या आणि अंतिम खंडणीची मागणी
दरम्यानच्याच काळात पीडितास (विद्यार्थ्याचे वडील) व्यवसायामध्ये तोटा झाल्याने त्याने आपले कुटुंब गुजरातला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने मुलाच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटची मागणी केली. मार्चमध्ये जेव्हा तो शाळेत गेला तेव्हा तो रुदागीच्या कार्यालयात अडकला . जिथे काळे आणि सागर देखील उपस्थित होते. दोघांनी त्याला खाजगी फोटो आणि व्हिडिओ दाखवले आणि मजकूर गुप्त ठेवण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. आरोपीने इतके पैसे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी आणि पीडितामध्ये वाटाघाटी झाल्या आणि 15 लाख रुपयांवर तडजोड झाली. ज्यामध्ये सुरुवातीची रक्कम म्हणून 1.9 लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. दरम्यान, श्रीदेवी रुदागी हिने 17 मार्च रोजी ठरलेल्या रकमेत बदल केला. आणि नवीच मागणी केली. ज्याध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही प्रवेश झाला (जो पुढे खोटा असल्याचे आढळले). ज्यामध्ये माजी पोलिस अधिकाऱ्यासाठी 5 लाख रुपये काळे आणि सागरसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये स्वतःसाठी 8 लाख रुपये रोख मागण्यात आले.
पोलिसांनी कारवाई आणि अटक
दबाव सहन न झाल्याने पीडिताने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी धमक्या आणि खंडणीच्या प्रयत्नांची पडताळणी केली. चौकशीत त्यांना आढळले की पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग बनावट होता. सीसीबीने रुदागी, काळे आणि सागर यांना अटक केली आणि त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवले. या प्रकारानंतर शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)