BJP MP Tejasvi Surya यांची होणारी पत्नी Shivasree Skanda Prasad कोण? घ्या जाणून
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिच्या चाहत्यांपैकी एक आहेत. YouTube चॅनेलवर शेअर केलेल्या कन्नड भक्ती गीत "Poojisalende Hoogala Thande," चे मोदींनीही कौतुक केले होते.
सध्या लगीनसराई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीही लग्न बंधनात अडकत असताना भाजपाचे तरूण खासदार Tejasvi Surya यांच्या लग्नाची देखील चर्चा सुरू झाली आहे. Tejasvi Surya- हे शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad सोबत रिलेशनशीप मध्ये असल्याची माहिती समोर येतआहे. त्यांची एंगेजमेंट झाली असून येत्या 2 महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
The Federal,च्या रिपोर्ट्सनुसार, Tejasvi Surya- Sivasri Skandaprasad यांचा विवाह 4 मार्च 2025 दिवशी बेंगलूरू मध्ये होणार आहे. हा एक दिमाखदार सोहळा असणार असल्याची चर्चा आहे.
शिवश्री स्कंदप्रसाद कोण आहेत?
शिवश्री स्कंदप्रसाद यांनी Sastra University मधून बायोइंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. सोबतच त्यांनी चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे. शिवश्रीने भारतातील अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये विशेषत: चेन्नईमध्ये परफॉर्म केले आहे. दरम्यान प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचाही तिने सोशल मीडीयात उल्लेख 'गुरूजी' असा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिच्या चाहत्यांपैकी एक आहेत. YouTube चॅनेलवर शेअर केलेल्या कन्नड भक्ती गीत "Poojisalende Hoogala Thande," चे मोदींनीही कौतुक केले होते. नक्की वाचा: Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केले शिवश्री स्कंदप्रसाद यांनी गायलेले श्री राम भजन .
शिवश्रीला सायकलिंग, ट्रेकिंग आणि चालणे यासारख्या आऊट डोअर अॅक्टिव्हिटींची आवड आहे. दरम्यान याच आवडी निवडी तिचे होणारे पती तेजस्वी सूर्या यांच्या देखील असल्याचे 'द वीक'ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. तिने अलीकडेच IRONMAN 70.3 गोवा ची चौथी एडिशन पूर्ण केली आहे. तेजस्वी देखील पहिलेच खासदार आहेत ज्यांनी IRONMAN या 3 अॅक्टिव्हिटीजचा समावेश असलेला प्रकार एक कठीण प्रकार पूर्ण केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)