Bengaluru Dog Breeder ने 20 कोटी मोजून विकत घेतला सिंहिणी इतक्या आकाराचा Caucasian Shepherd

Caucasian Shepherd बाबत बोलताना सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच नाव 'Cadabom Hayder'आहे.

Bengaluru Dog Breeder ने 20 कोटी मोजून विकत घेतला  सिंहिणी इतक्या आकाराचा Caucasian Shepherd
Satish with his Caucasian Shepherd dog. (Photo credits: Instagram/ satishcadaboms)

बंगळूरू मधील एका व्यक्तीने 20 कोटी मोजून एक Caucasian Shepherd dog विकत घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचं नाव सतीश आहे. Times of India च्या माहितीनुसार, Satish S,जे डॉग ब्रीडर आहेत आणि president of Indian Dog Breeders' Association आहेत. त्यांना हैदराबादच्या बिल्डरकडून कुत्र्याच्या खरेदीसाठी ऑफर होती पण ती नाकारत त्यांनी कुत्र्याला स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ते जगातील सर्वात महागडा कुत्रा बाळगणारे व्यक्ती झाले आहेत.

The Caucasian Shepherd Dog हा Caucasian Ovcharka आहे. हा अमेरिका, टर्की, अझरबैजान, गॉर्जिया मध्ये आढळतो. The Caucasian Shepherd,हा भारतामध्ये दुर्मिळ आहे. कुत्र्यांमध्ये हा अत्यंत हुशार, बोल्ड, आत्मविश्वासू, बेधडक कुत्रा आहे.

The Caucasian Shepherd dog हा शरीराच्या आकाराने देखील अवाढव्य असतो. केसाळ असतो. सामान्यपणे त्याचं वयोमान 10-12 वर्ष असतं. सिंहीणी इतका त्याचा शरीराचा आकार असतो. घराचं चोरड्ट्यांपासून रक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

Caucasian Shepherd बाबत बोलताना सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच नाव 'Cadabom Hayder'आहे. "हैदराबाद मधील एका ब्रीडरने Caucasian Shepherd ची माहिती दिली आणि मी त्याला विकत घेतलं. सहा महिन्यांपूर्वी त्याची खरेदी झाली पण त्याबद्दल फारशी कुणाला माहिती नव्हती." नक्की वाचा: Viral Video: पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने केलं असं काही, व्हिडिओ पाहून पाणावतील डोळे .

'Cadabom Hayder'ने अलीकडेच त्रिवेंद्रममधील केनेल क्लब इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि क्राउन क्लासिक डॉग शोमध्ये त्याने श्वानांच्या सर्वोत्तम जातीसाठी 32 पेक्षा अधिक पदकं जिंकली. सतीश म्हणाले की जेव्हा त्याच्या कुत्र्याने हैदरने अनेक ट्रॉफी आणि पदके जिंकली तेव्हा ते थक्क झाले. सध्या 'Cadabom Hayder' हे सतीशसोबत त्यांच्या घरीच राहत आहेत. आकाराने मोठा असलेला कुत्रा अत्यंत फ्रेंडली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).