BJP Worker Found Dead: भाजप कार्यालयात आढळला कार्यकर्त्याचा मृतदेह, महिलेला अटकेत; नेमक प्रकरण काय?

पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. दुसरीकडे भाजपने या प्रकरणी तृणमूलवर निशाणा साधला आहे.

Photo Credit- Pixabay

BJP Worker Found Dead: भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह कार्यालयाच्या आत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिने मान्य केलं आहे की धारदार शस्त्रांनी तिने कार्यकर्त्यावर ( BJP Worker Found Dead in Bengal) वार केले. या प्रकरणात या महिलेने ही कबुली दिल्याची माहिती आहे. ही घटना पश्चिम बंगाल येथील 24 परगणा जिल्ह्यातील उस्थी येथे घडली. पृथ्वीराज नासक असं या मृत कार्यकर्त्याचं (Woman Arrested) नाव आहे. पृथ्वीराज हा जिल्ह्यातील भाजपाचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळायचा. या प्रकरणात महिलेला अटक झाल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर पु्न्हा एकदा आरोप केला आहे.

नेमकी घटना काय?

पृथ्वीराज नासकर या भाजपा कार्यकर्त्याचा ( BJP Worker ) मृतदेह भाजपाच्या कार्यालयाच्या आतल्या बाजूला शुक्रवारी रात्री आढळून आला. पृथ्वीराज हा त्यांच्या घरातून ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे. यानंतर या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने धारदार शस्त्रांनी पृथ्वीराज नासकर यांची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. सध्या महिलेची चौकशी सुरू आहे. पृथ्वीराज नासकर आणि महिलेचे काही प्रेमसंबंध होते का? किंवा त्यांच्यात काही वाद झाला का? याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा-Dowry Death Case: हुंड्याच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांना जन्मठेपेची शिक्षा; उत्तर प्रदेशमधील घटना)

सध्या पोलीस आरोपीचा मोबाइल फोन सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. घटनेतील सर्व पैलूही तपासले जात आहेत. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कार्यालयाचं समोरचं गेट तोडल्याच्या अवस्थेत होते. महिलेने हत्या केली आणि ती मागच्या दरवाजाने पळून गेली असं घडलेलं असू शकतं असंही पोलीस म्हणाले. मात्र या महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिची चौकशी सुरु आहे.