BDO India Hiring: कर्मचारी कपातीदरम्यान आनंदाची बातमी; बीडीओ इंडिया देणार 25 हजार लोकांना रोजगार

कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी 40 ते 45 टक्के दराने वाढत आहे.

(Photo credit: archived, edited, representative image)

जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरु आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे. व्यावसायिक सेवा फर्म बीडीओ इंडिया (BDO India) भारतात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. बीडीओ इंडियाचे म्हणणे आहे की, त्यांनी 25,000 नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन भरतीची माहिती देशातील बेरोजगारांना दिलासा देणारी बातमी ठरणार आहे.

बीडीओ इंडिया कंपनीचे सीईओ मिलिंद कोठारी म्हणतात की, कंपनीच्या देशातील विस्तार योजना पाहता, नोकऱ्या वाढवल्या जातील आणि नवीन व्यावसायिकांची भरती केली जाईल.

देशात आणि जगात मंदीचे सावट आहे. भारतासह अनेक जागतिक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची छाटणी सुरू आहे. आता अकाउंटिंग क्षेत्रात काम करणारी बीडीओ इंडिया येत्या 5 वर्षांत 25,000 लोकांना आपल्या कार्यबलात जोडेल. अशाप्रकारे दरवर्षी सुमारे 5,000 लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. मिलिंद कोठारी म्हणतात की, बीडीओने 2013 मध्ये केवळ 230 कर्मचारी आणि 2 कार्यालयांसह काम करण्यास सुरुवात केली होती. आता कंपनी 2028 च्या अखेरीस भारतातील ऑपरेशनमध्ये सुमारे 17,000 लोकांची आणि ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये 8,000 लोकांची भरती करेल.

(हेही वाचा: दिलासादायक! फ्रेंच कंपनी Thales मध्ये 12,000 कर्मचाऱ्यांची होणार भरती; भारतात 550 लोकांची नियुक्ती)

बीडीओने 10 वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक सेवा क्षेत्रातील एक मजबूत खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी 40 ते 45 टक्के दराने वाढत आहे. कंपनीचे सल्लागार, आयबीएस आणि ट्रान्झॅक्शन सपोर्ट सर्व्हिससारखे व्यवसाय दरवर्षी सुमारे 30 ते 35 टक्के दराने वाढत आहेत. अशाप्रकारे 10 वर्षांच्या कालावधीत, फर्मने अत्यंत स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा उद्योगात पाय रोवण्यास यशस्वीरित्या स्वताला व्यवस्थापित केले आहे.