Bareilly Shockers: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घोडीसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी 3 जणांना अटक

या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली तर दोन जण फरार आहे.

Arrested | (File Image)

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये माणूसकीला कालीमा फासणारी एक घटना घडली आहे.  एका घोडीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली तीन पुरुषांना येथे अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. शनिवारी या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी आरोपींवर त्वरित कारवाई करण्यास सांगितले. हाफिजगंज स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) संजय सिंह यांनी सांगितले की, देवेंद्र (22), रिझवान (23) आणि आमिर (21) यांना शनिवारी अटक करण्यात आली तर इतर दोन आरोपी भागवत शरण आणि झीशान यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  (हेही वाचा - BJP Ticket Scam: कर्नाटक भाजपामध्ये तिकीट घोटाळा? 2 कोटी रुपयांना गंडा, दोघांविरोधात गुन्हा दाखल)

व्हिडिओमध्ये नवाबगंजमधील इनायतपूर गावातील रहिवासी शरण घोडीसोबत अनैसर्गिक संभोग करताना दिसत आहे, तर झीशानने प्राण्याचा लगाम धरला होता, असे एसएचओने सांगितले. इतर तीन आरोपीही व्हिडिओमध्ये शरणच्या शेजारी उभे असल्याचे दिसत आहे, असे त्यांनी सांगितले. एसएचओने सांगितले की, पाच आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि आयपीसीच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.