IPL Auction 2025 Live

Bank Holidays: सणासुदीच्या दिवसात आजपासून पुढील पाच दिवस बॅंका बंद! जाणून घ्या सविस्तर माहिती

पुढील पाच दिवस बॅंका बंद असल्याने एटीएम किंवा ऑनलाईन बॅंकींच्या साहाय्याने तुम्ही या दरम्यान सहज व्यवहार करु शकणार आहात.

Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

आजपासून दिवाळ सणाला (Diwali Festival) सुरुवात झाली आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनोत्रयादशी (Dhanotrayadashi). दिवाळीच्या मुहूर्तावर चौफेर बाजारपेठा सजल्या आहे, सणाच्या पार्श्वभुमिवर नव्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. पण सणासुदीच्या दिवसात सलग पाच दिवस सरकारी सुट्ट्या (Government Holidays) असल्याने बॅंका बंद असणार आहे. तरी तुम्हाला बॅंकेचे व्यवहार करायचे असल्यास आता तुम्हाला सलग पाच दिवस वाट बघावी लागणार आहे. कारण 22 ऑक्टोबर (October) ते 26 ऑक्टोबर दरम्यान बॅंकेला सुट्ट्या असणार आहेत. 22 ऑक्टोबर म्हणजे आज चौथा शनिवार (Saturday) असल्याने बॅंका बंद असणार आहे. तर उद्या म्हणजे रविवारच्या सुट्टीमुळे बॅंक बंद आहे. एटीएम किंवा ऑनलाईन बॅंकींच्या (Online Banking) साहाय्याने तुम्ही या दरम्यान सहज व्यवहार करु शकणार आहात पण बॅंकेत जावून थेट पैशाची लेनदेन या दरम्यान तुम्हाला करता येणार नाही.

 

24 ऑक्टोबर म्हणजे लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan). हा दिवाळ सणातील सर्वात मोठा दिवस. या दिवशी बॅंकेला सरकारी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. म्हणून सोमवारी म्हणजेचं आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी बॅंक बंद असणार आहे. तर 25 ऑक्टोबरला देशातील काही शहरांमध्ये दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याने काही ठिकाणी बॅंकांना सुट्टी असेल पण मंगळवारी (Tuesday) महाराष्ट्रात बॅंका सुरु असणार आहेत. (हे ही वाचा:- Gold Silver Rate on Dhanteras: धनोत्रयादशीच्या दिवशीच्या मुहूर्तावर करा सोनं-चांदी खरेदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर किती?)

 

26 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी भाऊबीज (Bhau Beej) आणि बलिप्रतिपदा (Balipratipada) एकाचं दिवशी असल्याने बॅंकाना सुट्टी (Bank Holiday) आहे. म्हणजेच देशभरातील काही भागात सलग 5 दिवस तर महाराष्ट्रात बॅंकांना 4 दिवस सुट्ट्या असणार आहे. 22 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर रोजी राज्यात बॅंका बंद असणार आहे.